धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल
वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल लॉज मालकावर गुन्हा दाखल
धाराशिव शहरातील देह विक्री करून घेणाऱ्या दलांचे सत्र संपता संपेना !
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - धाराशिव शहरातील तांबरी विभागातील किरण महादेव गुरव व्यवसाय (हॉटेल लॉज मालक) यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दि.४ एप्रिल
रोजी ३ वाजण्याच्या सुमारास जुनोनी रोड अंबेहोळ रोडच्या लगत असलेल्या हॉटेल बालाघाट कॅफेटेरिया व्हेज नॉनव्हेज बिअर बार रेस्टॉरंट ऍड लॉजवरील २ महिलांना वाणिज्यिक प्रयोजनासाठी आश्रय देऊन त्यांना ग्राहकांच्या मागणी प्रमाणे लैंगीक समागमनासाठी पराववृत्त करुन तिला वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्यावरती उपजिवीका करीत असताना पंचा समक्ष मिळून आला. या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकून कारवाई करुन यातील पिडीत २ महिलांची सुटका केली. या प्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून गुरव यांच्या विरोधात भा.द.स. कलम ३७० सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ४, ५, ६ व ७ अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.