Posts

नूतन जिल्हा न्यायाधीश ख्वाजा व कुलकर्णी यांचा सत्कार

नूतन जिल्हा न्यायाधीश ख्वाजा व कुलकर्णी यांचा सत्कार धाराशिव(प्रतिनिधी) - धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचे नूतन जिल्हा न्यायाधीश - १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एफ.ए.के.एम. ख्वाजा व ५ वे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), एस.व्ही. कुलकर्णी यांचा धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव तर अध्यक्षस्थानी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. खंडेराव चौरे, जिल्हा न्यायाधीश - ३ तथा अति. सत्र न्यायाधीश शंकर ठुबे, जिल्हा न्यायाधीश - ४ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश खोमणे मुख्य न्याय दंडाधिकारी पी.व्ही. मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. नू तन जिल्हा न्यायाधीश ख्वाजा आणि दिवाणी न्यायाधीश कुलकर्णी यांचा सत्कार जिल्हा विधिज्ञ मंडळ पदाधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.खंडेराव चौरे यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा विधिज्ञ मंडळाचे सहसचिव ॲड.संजय भोरे यांनी व आभार सचिव ॲड.बाळासाहेब आवड यांनी मानले. यावेळी ज...

शिक्षण हेच उज्ज्वल भवितव्याचे प्रभावी साधन - अ‍ॅड. गुंड पाटील

शिक्षण हेच उज्ज्वल भवितव्याचे प्रभावी साधन - अ‍ॅड. गुंड पाटील धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - शिक्षण हे केवळ नोकरी किंवा व्यवसाय मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, संस्कार, आत्मविश्वास आणि समाजात सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन रूपामाता इरा इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. व्यंकट गुंड पाटील यांनी केले. धाराशिव शहरातील रुपामाता इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालक यांच्या स्वागत प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक सर्वपल्ली अरुणजीवनकुमार, उपमुख्याध्यापक व्ही. ए. पिंपरकर, रुपामाता परिवारातील गजानन पाटील, अनिकेत नवले, हर्षल मोहिते तसेच हेड मॅनेजर ए. व्ही. ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना ऍड गुंड पाटील म्हणाले की, ज्ञानाच्या बळावरच विद्यार्थी आपल्या जीवनातील ध्येय गाठू शकतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित अभ्यास, शिस्त आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले . शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी व पालक यांचे स्वागत पुष्प...

युवा माहेश्वरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकृष्ण मुंदडा

युवा माहेश्वरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकृष्ण मुंदडा धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - जिल्हा युवा माहेश्वरी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीनुसार अध्यक्षपदी श्रीकृष्ण मुुंदडा यांची तर सचिवपदी गोकुळ बांगड यांची निवड करण्यात आली. जिल्हा युवा माहेश्वरी संघटनेची त्रैवार्षिक कार्यकारणी जाहीर निवडण्यात आली. प्रक्रिया माजी अध्यक्ष महेश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली व निरीक्षक मदनलाल मिनीयार उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष अक्षय तोतला व संकेत जाजू तर सहसचिव सुयोग काकाणी, व्यंकटेश मुंदडा यांची व योगेश सारडा तर  कोषाध्यक्ष मोहीत मंत्री, सांस्कृतिक प्रमुख राम मुंदडा तर आरोग्य प्रमुख संतोष मिनियार, क्रीडा प्रमुख शैलेश बांगड, समाजकल्याण प्रमुखपदी गोकुळ भराडिया, जनसंपर्कप्रमुखपदी सुजित दरक, मीडीया व आयटी सेलट सिध्दांत भन्साळी यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील श्रृंखला असणार्‍या संघटनेमार्फत युवकांच्या विविध समस्या, व्यावसायिक व शैक्षणिक गरजांची पूर्तता करून त्यांना सहाय्य करण्याचे काम या संघटनेमार्फत सुरू आहे. तसेच जिल्हाभरात युवक व युवतींसाठी अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्...

काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी स्वीकारला पदभार

काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी स्वीकारला पदभार धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड झाली असून त्यांनी पदभार स्वीकारला. धाराशिव शहरातील काँग्रेस भवनमध्ये आयोजित कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील, माधव कुतवळ, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, विश्वास शिंदे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, प्रदेश सचिव डॉ. नवगिरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिजित चव्हाण, शिला उंबरे, प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर, पांडुरंग कुंभार, राजाभाऊ शेरखाने, मधुकर बिद्री, प्रशांत पाटील, खलील सय्यद, नानाभाऊ भोसले, महेबूब पटेल, विनोद वीर, विलास शाळु, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गोदावरी केंद्रे, अर्जुन बिराजदार, सर्फराज काजी, धनंजय राऊत, अग्निवेश शिंदे, शिवाजी गायकवाड, विजय वाघमारे, तोडकर, अशोक बनसोडे, गपाट, रुपेश शेंडगे, अमोल कुतवळ, बापू हरकर, सत्तार शेख, नगरसेवक अझर पठाण, बापू शेळके, ॲड. गणपती कांबळे, आयुब पठाण, अभिमान पेठे, अंकुश पेठे, मुहिब शेख, मौलाना शौकत, लक्ष्मीकांत खटके, बालाजी हूबाळे, नगरसेवक इम्रान शेख, राजुद...

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी ११८ पदांना मान्यता - आ. पाटील

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी ११८ पदांना मान्यता - आ. पाटील धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही महानगरांतील विद्यार्थ्यांप्रमाणे अत्याधुनिक अभियांत्रिकी शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा, नवतंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. या क्षेत्रातील भविष्यातील संधी पाहता त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी आम्ही दृढनिश्चयी असून या दिशेने सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने अनेक वर्षांपासून त्याची मागणी होती. त्याअनुषंगाने आई तुळजाभवानी मातेच्या नावाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित...

नगर परिषदेची जागा विक्री करणाऱ्याने दिली धमकी !

नगर परिषदेची जागा विक्री करणाऱ्याने दिली धमकी  धाराशिव दि. ११ (प्रतिनिधी) - नगर परिषदेने मोबदला देऊन खरेदी घेऊन आरक्षित केलेली जागा काहीजणांनी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या संगणमताने ती विक्री केलेली आहे. या विरोधात तक्रार केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करीन व तुझे आयुष्य बरबाद करीन अशी धमकी दिली आहे. त्यामुळे त्या कथित विक्री प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे  जिल्हाध्यक्ष राज धज यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.११ जून रोजी केली आहे. धाराशिव, नगर पालिकेने २००३ मध्ये सर्व्हे क्रमांक २०६/२ मधील जागा आरक्षित केली असून ती जागा पालिकेने मोबदला देऊन अधिग्रहित केली आहे. मात्र, काही व्यक्तींनी दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या क्षेत्रातील जमिनीची विक्री केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी यापूर्वीही तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे त्या श व्यवहारा संदर्भातील खरेदी खत आणि नंतरचे दस्तऐवज पाहता सर्व्हे क्र...

तुळजापूर बस स्थानकात घाणीचे साम्राज्य ! देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना सीसीटीव्ही कॅमेरे बंद ; चोरांचा सुळसुळाट !

Image
तुळजापूर बस स्थानकात घाणीचे साम्राज्य ! देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना सीसीटीव्ही कॅमेरे बंद ; चोरांचा सुळसुळाट ! धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ या ब्रीदनुसार प्रवाशांना सुविधा देत आहे. त्यातच लालपरी गावोगावी पोहोचलेली आहे. या बसनेच आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून भाविक दररोज दर्शनासाठी   मोठ्या प्रमाणात तुळजापूर नगरीत दाखल होतात. मात्र, बसचा दरवाजा उघडून पायऱ्यावरून खाली पाय पडताच समोर नजर जाते ती थेट कचऱ्याच्या ढिगार्‍यावरच आणि श्वास घ्यावा लागतो तो दुर्गंधीचाच. त्यामुळे आई तुळजाभवानीच्या नगरीतील बस स्थानक परिसरात नाईलाजाने कचऱ्याचे ढीग व साचलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधींचा भाविकांना सामना करावा लागत आहे. तुळजापूर नगरीत आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होतात. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बस स्थानक अपुरे पडू लागले. त्यामुळे दोन बस स्थानक उभारुन तेथे बस व भाविक यांची सोय केली गेली आहे. या बस स्थानकावर शौचालय आहेत‌. मात्र, शौचालयात पाणी असून देखील त्याचा...