#lcb#crime एमपीडीए आदेश देण्यास गेलेल्या पोलीस हवालदारास धक्काबुक्की
एमपीडीए आदेश देण्यास गेलेल्या पोलीस हवालदारास धक्काबुक्की
धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - एमपीडीए आदेश देण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदारास धक्काबुक्की करुन आरोपींनी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा केला. या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील पाटोदा पाटी येथील व हल्ली धाराशिव शहरातील साठे नगरमध्ये राहणाऱ्या अविनाश दिलीप भोसले, सुग्रीव अंकुश पवार, रवि अरलिंग्या पवार व चमेली अविनाश भोसले दि.१३ डिसेंबर रोजी १०.१५ वाजण्याच्या सुमारास साठेनगर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार हुसेन नसीर खॉन सय्यद (वय ३७ वर्षे) हे पोलीस कर्मचाऱ्यांसह त्या आरोपींच्या राहते घरी एमपीडीए आदेश पारीत करण्यासाठी गेले असता अविनाश भोसले याने स्वत:च्या हाताने व चाकूने छातीवर व पोटावर वार करुन घेवून जखमी होवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर रवि, सुग्रीव व चमेली यांनी तो आदेश पारीत करण्यास अटकाव करुन धक्काबुक्की करुन खोटी तक्रार करण्याची धमकी देवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी हुसेन सय्यद यांनी दि.१३ डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरुन धाराशिव शहर पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३०९, १८९, ५०६, ३४ भा.दं.वि.सं. कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.