आरोग्य समृद्ध जिल्ह्यासाठी विकसित धाराशिव @2047 आरोग्य कार्यशाळा दिशा दर्शक - डॉ. हरिदास

आरोग्य समृद्ध जिल्ह्यासाठी विकसित धाराशिव @2047 आरोग्य कार्यशाळा दिशा दर्शक - डॉ.  हरिदास
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरण, माता-बाल आरोग्य सुधारणा, पाणीजन्य व हंगामी आजारांवरील नियंत्रण, असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, आपत्कालीन सेवांची उभारणी, पायाभूत सुविधा विकास, मानव संसाधन बळकटीकरण आणि डिजिटल हेल्थ सिस्टीमचा विस्तार या क्षेत्रांवर केंद्रित काम करणे अत्यावश्यक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतिश हरिदास यांनी सांगितले.

 तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या सभागृहात आयोजित धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण, शाश्वत आणि भविष्यकालीन विकासाचा मार्ग आखण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या ‘विकसित धाराशिव @2047’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आरोग्य क्षेत्राचा सखोल अभ्यास आणि भावी नियोजनासाठी एक दिवसीय अभ्यास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) कॅम्पसचे संचालक प्रा. बाळ राक्षसे स्पर्श संस्थेचे रमेश जोशी आदी उपस्थित होते.
 पुढे बोलताना डॉ हरिदास म्हणाले की, शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्या समन्वयातूनच सक्षम आरोग्य व्यवस्था उभी राहू शकते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर प्रा. बाळ राक्षसे म्हणाले की, विकसित धाराशिव @2047 ही फक्त संकल्पना नसून ग्रामिण व शहरी समाजाला केंद्रस्थानी ठेवून सक्षम, जागरूक आणि आरोग्यदायी जिल्हा घडविण्याचा सामूहिक प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जिल्ह्याच्या लोकसंख्या रचनेनुसार सेवा नियोजन, भौगोलिक परिस्थितीनुसार सुविधा उभारणी, आपत्कालीन सेवांची उपलब्धता, तंत्रज्ञानाचा वापर, मानव संसाधन कौशल्यवृद्धी आणि 2047 पर्यंत साध्य करावयाच्या दीर्घकालीन उद्दिष्टांची दिशा यावर त्यांनी प्रकाश टाकला. विशेष म्हणजे ग्रामीण-शहरी आरोग्य दरी कमी करण्यासाठी आवश्यक उपाय योजना राबविण्यात चे त्यांनी सांगितले. त्यासाठी क्षेत्र भेटींच्या माध्यमातून केले जाणारे अनुभवाधारित संशोधन आरोग्य विकास आराखडा तयार करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी करण्यात आलेल्या गट चर्चांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय आव्हाने, स्थानिक आरोग्य समस्या, नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजेनुसार पायाभूत सुविधा तसेच शाश्वत उपाययोजना यांचे प्रस्ताव मांडले. या सूचनांमुळे विकसित धाराशिव @2047 च्या आरोग्य आराखड्यास वैज्ञानिक आणि स्थानिक वास्तवावर आधारित भक्कम आधार प्राप्त होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश चादरे यांनी तर उपस्थितांचे आभार आनंद भालेराव यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी गणेश चादरे, शंकर ठाकरे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेस जिल्हा व तालुका स्तरावरील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !

जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या बनावट पीएचा सुळसुळाट !कामे मंजूर करण्यासाठी १२ ते १५ टक्के वसूल ! एका माजी आमदारासह दलालांनी कोट्यावधी लाटले