तुळजापुरात १० जानेवारी रोजी राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
तुळजापुरात १० जानेवारी रोजी राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
तुळजापूर दि.११ (प्रतिनिधी) - येथील युवास्पंदन सामाजिक संस्था व मराठवाडा सामाजिक संस्था यांच्यावतीने श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सवनिमित्त इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंत एकूण तीन गटात राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा तुळजाभवानीची. . . वक्ता महाराष्ट्राचा २०२६ चे आयोजन दि.१० जानेवारी रोजी करण्यात आले असल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष अमर हंगरगेकर, युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे व मराठवाडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर यांनी दिली.
या स्पर्धेचे हे वर्ष १७ वे वर्ष असून या स्पर्धा तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या स्पर्धेत पहिल्या गटासाठी इयत्ता ३ री ते ४ थी साठी छत्रपती शिवाजी महाराजांची पन्हाळ गडावरून सुटका, मला पडलेले सुंदर स्वप्न, राष्ट्रसंत गाडगे महाराज, सैनिक माझा खरा हिरो आणि मैत्री हे पाच विषय असून एका शाळेतून जास्तीत जास्त २ स्पर्धकांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त ४ मिनिटे वेळ असणार आहे. तर गट दुसरा इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी साठी गुप्तहेर खात्याचे जनक : बहिर्जी नाईक, राष्ट्रनिर्मितीमध्ये माझा वाटा, भारतीय संस्कृतीचे आम्ही शिलेदार, माणुसकीचा धर्म आणि जगण्यासाठी लढण्याचे दिवस हे पाच विषय असून यासाठी एका शाळेतून जास्तीत जास्त १ स्पर्धकांना प्रवेश देण्यात येणार असून वेळ ५ मिनिटे असणार आहे. तसेच गट तिसरा इयत्ता ८ वी ते १० वी साठी लहरी निसर्ग आणि हताश बळीराजा, सामाजिक समतेसाठी समाजाची भुमिका, जागर स्त्री शक्तीचा, सन्मान स्त्री मुक्तीचा, रिल लाईफ आणि रियल लाईफ आणि नवभारत २०४७ : युवा पिढीकडून अपेक्षित योगदान हे पाच विषय असून एका शाळेतून जास्तीत जास्त १ स्पर्धकांना प्रवेश देण्यात येणार असून वेळ ७ मिनिटे असणार आहे. स्पर्धेमध्ये पारितोषिके म्हणून इयत्ता ३ री ते ४ थी या गटासाठी प्रथम अनुक्रमे रोख ३५०० रुपये तर द्वितीय ३००० रुपये तसेच तृतीय २५०० रुपये तर चतुर्थ २००० रुपये तर पाचवे १५०० रुपये तसेच सहावे १००० रुपये तर ७५० आणि उत्तेजनार्थ ५ प्रत्येकी ५०० रुपये, प्रमाणपत्र व चषक तसेच इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी या दोन्ही गटांसाठी स्वतंत्र पारितोषिके प्रथम रोख रुपये ५००० रुपये, द्वितीय ३५०० रुपये, तृतीय रोख रुपये २५० रुपये चतुर्थ २००० रुपये, पाचवे १५०० रुपये, सहावे १००० रुपये, सातवे ७५० रुपये आणि उत्तेजनार्थ ५ प्रत्येकी रोख ५०० रुपये, प्रमाणपत्र व चषक याप्रमाणे पारितोषिके देऊन विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट वक्ता
"स्पर्धा तुळजाभवानीची, वक्ता महाराष्ट्राचा"
प्राथमिक गटात इयत्ता ३ री ते ४ थी साठी सर्वाधिक गुणानुक्रमे पारितोषिके प्राप्त शाळेस कै. दत्तात्रय पांडुरंग गवळी यांच्या स्मरणार्थ फिरती ढाल व डिजिटल प्रमाणपत्र. तर माध्यमिक गट ५ वी १०!साठी सर्वाधिक पारितोषिके प्राप्त शाळेस माजी जिल्हाधिकारी कै.द.रा. बनसोड यांच्या स्मरणार्थ फिरता चषक व डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल व सर्व गटातून उत्कृष्ट वक्ता दिवसाचा मानकरी "स्पर्धा तुळजाभवानीची, वक्ता महाराष्ट्राचा" हे पारितोषिक देण्यात येईल. तसेच
गट क्र १ साठी ३ री ते ४ थी यासाठी उक्त नमूद पारितोषिकांची सर्व रोख रक्कम कै. छाया माधवराव कुतवळ व कै. लक्ष्मीबाई नरहरी कदम यांच्या स्मरणार्थ असून गट क्र. २ साठी ५ वी ते ७ वी व गट क्र.३ इयत्ता ८ वी ते १० वी या दोन्ही गटांसाठी स्वतंत्र पारितोषिकांची रोख रक्कम प्रथम पारितोषिक कै. अंबादास शंकर अपराध यांच्या स्मरणार्थ तर द्वितीय पारितोषिक कै. हरिश्चंद्र गुंडिबा हंगरगेकर यांच्या स्मरणार्थ, तृतीय पारितोषिक कै. दिलीप (आप्पा) भालचंद्र गंगणे यांच्या स्मरणार्थ, चतुर्थ पारितोषिक कै. अरुण चंदरराव सोंजी यांच्या स्मरणार्थ, पाचवे पारितोषिक कै. जीवनराव पाटील यांच्या स्मरणार्थ, सहावे पारितोषिक कै. चंद्रकांत इंगळे गुरुजी यांच्या स्मरणार्थ व उत्तेजनार्थ ५ पारितोषके कै. सुरेश पांडुरंग कावरे, कै. रत्नमाला सुरेश कावरे व जनार्दन गोविंदराव राऊत यांच्या स्मरणार्थ तसेच तिन्ही गटासाठी संयोजक कोट्यातून १२ पारितोषिके प्रत्येकी रोख ३५० रुपये कै. चंद्रकांत दासाराव रोचकरी, कै.आंबुबाई दिगंबर हुंडेकरी, कै. रत्नाकर रामचंद्र कुलकर्णी व कै. तुळशीराम पंडू गायकवाड यांच्या स्मरणार्थ असून सदरील स्पर्धेसाठी संपूर्ण चषक हे बालाजी अमाईन्स, तामलवाडी- सोलापूर यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. ह्या स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व शाळेसाठी खुल्या व विनामूल्य राहतील. प्रवेश स्वीकारण्याची अंतिम दि. ७ जानेवारी, असून स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी निरंजन विष्णुपंत डाके (मोबाईल क्रमांक ) ७८४३०८१८०९ यांच्याकडे विहीत मुदतीत करुन या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सचिव देजंवेंद्र पवार, प्रा. डाॅ. प्रशांत भागवत, उपाध्यक्ष जीवन इंगळे, विनोद पलंगे, स्पर्धा प्रमुख शिवशंकर जळकोटे, संदीप गंगणे, निरंजन डाके, चंद्रकांत साळुंके, जयमाला वटणे, जयश्री माळी, उज्ज्वला जोशी, सीमा दुधगी व ज्ञानेश्वरी शिंदे यांनी केले आहे