शेतकऱ्यांनी एआय ॲप डाऊनलोड करुन माहिती मिळवावी
शेतकऱ्यांनी एआय ऍप डाऊनलोड करुन माहिती मिळवावी
परंडा दि.११ (प्रतिनिधी) - तालुक्यातील शेळगाव येथील माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कृषी विभागाच्या महाविस्तार एआय ऍप विषयी मार्गदर्शन करून ते ऍप डाऊनलोड करून माहिती मिळवावी असे आवाहन केले.
परंडा तालुक्यातील शेळगाव येथील माणिकबाबा विद्यालयात विद्यार्थी, शेतकरी, पालक व ग्रामस्थ यांना महाविस्तार एआय ऍप विषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष ऍड सुभाषराव मोरे हे होते. कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, मंडळ कृषी अधिकारी सुनिल थोरबोले व सहाय्यक कृषी अधिकारी गुंड आदी उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी लांडगे यांनी विद्यार्थी, शेतकरी व पालक गावातील ग्रामस्थ यांच्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत महाविस्तार एआय तंत्रज्ञान शेतीतील उत्पादन वाढीसाठी किती महत्त्वाचे आहे ? ऍपमध्ये पीक वाढीच्या टप्प्यानुसार पीक सल्ला अचूक माहिती मिळेल. तर हवामानाचा अचूक अंदाज यामध्ये सांगितले जाईल. तसेच कीड व रोग ओळख आणि उपाय यामध्ये सांगितले जाईल याची माहिती त्यांनी सांगितली. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शेतकरी पालकांना तसेच इतरांनाही महाविस्तार ए आय ऍप डाऊनलोड करून वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी प्रोत्साहन देण्यासाठी जे विद्यार्थी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना महाविस्तार ए आय ऍप विषयी माहिती देऊन ऍप डाऊनलोड करतील त्यांना विशेष बक्षीस देण्यात येणार असल्याचे आश्वासन असे कृषी विभागामार्फत देण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य कुमटकर यांनी आजचे विद्यार्थी हे २०४० च्या दशकातील भारताचे शेतकरी होणार आहेत. त्यांनी महाविस्तार एम्ह तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना मदत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर ऍड .सुभाषराव मोरे यांनी विद्यार्थी, पालक ,शेतकरी यांना या कृषी विभागाच्या महाविस्तार एआय ऍप या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीचे प्रश्न सोडविले पाहिजेत. तसेच आपल्या पालकांना शेतीत काम करण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. उपक्रमशील शिक्षक पठाण यांचे कृषी विभागाशी संबंधित ज्वारी काढणे यंत्र विभाग स्तरीय स्पर्धेत प्रथम आल्याने पठाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कृषी अधिकारी गुंड यांनी तर सूत्रसंचालन शिंगाडे यांनी व उपस्थितांचे आभार प्रा गरड यांनी मानले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी अधिकारी सुनील थोरबोले, सरपंच विष्णू शेवाळे, माजी प्राचार्य काळे, परदेशी, पाटील, मोहन शिंदे, विलास मोरे पाटील , हनुमंत हुरकुडे, सुभाष जगताप, जीवन मोरे आदींसह शेतकरी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.