परंडा आगारात प्रवासी राजा दिन साजरा

परंडा आगारात प्रवासी राजा दिन साजरा

परंडा दि.१० (प्रतिनिधी) - येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात धाराशिव विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या उपस्थितीत प्रवाशी राजा दिन दि.१० डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला.

परंडा येथील आगारात आयोजित कार्यक्रमामध्ये प्रवाशी प्रतिनिधी म्हणून प्रवाशी संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण शहा, पत्रकार प्रमोद वेदपाठक, अनंत खर्डेकर, प्रशांत मिश्रा, शहाजी कोकाटे, बावची विद्यालयाचे शिक्षक विकास वाघमारे यांनी प्रवाशांच्या समस्या व सूचना मांडल्या. यावर योग्य उपाय योजना करून प्रवाशांची गैरसोय होणार नाही. तसेच बस स्थानक व एस.टी. बसेसच्या स्वच्छतेमध्ये सुधारणा करून बसेस वेळेवर धावतील याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन आगार व्यवस्थापक बालाजी मुळे यांनी दिले. तसेच पॅकेज टूर्स अंतर्गत ४४ जणांची ग्रुप बुकिंग झाल्यास मागणीनुसार तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी बस सोडण्यात येईल. तर गाणगापूर (तुळजापूर-अक्कलकोट) व कोल्हापूर आदमापूर तसेच इतर तीर्थ क्षेत्र ठिकाणी बस सोडण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुळे यांनी केले. तसेच यासंदर्भात चौकशी करण्यासाठी आगारप्रमुख मुळे (९२८४७८२४६५) वाहतूक निरीक्षक गो.अ. खराटे (७३५०९३७०५४) व वाहतूक नियंत्रक हुसेनी (९०९७२७०४४५) पालके (९४२१८७४४८७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. उपस्थितांचे आभार प्रभारक सचिन कांबळे यांनी मानले. यावेळी आगारातील सर्व यांत्रिक, चालक, वाहक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !

जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या बनावट पीएचा सुळसुळाट !कामे मंजूर करण्यासाठी १२ ते १५ टक्के वसूल ! एका माजी आमदारासह दलालांनी कोट्यावधी लाटले