तुळजापूर तालुक्यासाठी कार्डियक ॲम्बुलन्स मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु

तुळजापूर तालुक्यासाठी कार्डियक ॲम्बुलन्स मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु



धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - विविध प्रकारचे आजार वाढत असल्यामुळे रुग्णांना दिलासा देण्यासाठी कार्डियक ॲम्बुलन्स उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवसेना (शिंदे) चे तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्या मागणी आधारित मंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून योग्य प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्डियक ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक त्यांच्याकडे पाठविला असून कार्डियक ॲम्बुलन्स उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे तुळजापूर तालुक्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने चांगले पाऊल पडणार आहे.

तुळजापूर तालुक्यासाठी कार्डियक ॲम्बुलन्स मंजूर करून द्यावी अशी मागणी शिवसेना (शिंदे) चे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी दि. १६ ऑक्टोबर रोजी केली होती. त्यासाठी पाठपुरावा देखील सातत्याने सुरू ठेवला होता. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून  कार्डियक ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या स्तरावरुन आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश दिले होते. ती प्रक्रिया पूर्ण करून हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी असे नमूद करीत त्याची प्रत पालकमंत्री यांच्या कार्यालयास पाठवून द्यावी असे सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना तुळजापूर तालुक्यासाठी कार्डियक ॲम्बुलन्स करून देण्याचा परिपूर्ण प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे जाधव यांच्या मागणीला यश आले असून तुळजापूर तालुक्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !

जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या बनावट पीएचा सुळसुळाट !कामे मंजूर करण्यासाठी १२ ते १५ टक्के वसूल ! एका माजी आमदारासह दलालांनी कोट्यावधी लाटले