ते निलंबनाचे पत्र फेक, काँग्रेसने पुन्हा काम करण्याचे दिले आदेश - मोरे
- Get link
- X
- Other Apps
ते निलंबनाचे पत्र फेक, काँग्रेसने पुन्हा काम करण्याचे दिले आदेश - मोरे
उमरगा दि.८ (प्रतिनिधी) - काँग्रेस पक्षात काही विघ्न संतोषी लोकांनी माझे निलंबन केले होते. फेक पत्र तयार करून बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पक्षाने शहानिशा केली असून ते निलंबन झाले नाही. त्यामुळे पुन्हा आपण या पदावर जोमाने काम करावा असा लेखी आदेश दिला असल्याची माहिती जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आश्लेष मोरे यांनी दि.५ डिसेंबर रोजी दिली.
उमरगा येथील तालुका काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एम ओ पाटील, अर्जुन बिराजदार, विजय वाघमारे, मधुकर यादव, रेखा सुर्यवंशी, विजय तळवडे, बाबा मस्के, ऍड शुभदा पोद्दार, ॲड दिलीप सागर व विशाल काणेकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मोरे म्हणाले की, उमरगा नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना (शिंदे) युती केल्याने हे निलंबनाचे खोडसाळ पत्र दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमावर झाले होते. त्यानंतर मी तात्काळ राजीनामा दिला होता. मात्र काँग्रेस पक्षाच्या निदर्शनासही बाब आल्यानंतर ते निलंबन रद्द केल्याचे पत्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिले, असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नगर परिषद निवडणुकी स्थानिक पातळीवर सर्वांना विश्वासात घेऊन निवडणूक युती करुन लढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. युती करणे राजकीय अपरिहार्यता होती. अन्यथा काँग्रेस पक्षाचे या निवडणुकीमध्ये अस्तित्व नष्ट झाले असते. मात्र निवडणुकीत काँग्रेस पक्षातील काही विरोधकांनी माझ्या निलंबनाचे फेक पत्र तयार केले. त्याचा काँग्रेस पक्षांशी कसलाही संबंध नाही याबाबत पक्षाने यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमली असून यातील सूत्राधाराचे नाव लवकरच निष्पन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निलंबनाची कसलीही शहानिशा न करता मी तडकाफडकी राजीनामा दिला. मात्र गेल्या एक वर्षात काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी काम केल्याने पक्षाने योग्य शहानिशा करुन हे फेक निलंबन असल्याचे जाहीर करून पुन्हा पक्षाने जोमाने काम करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाला गत वैभव मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मोरे यांनी दिले.
- Get link
- X
- Other Apps