वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - जिल्ह्यासह जिल्ह्याच्या विविध भागात वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातील काही नामांकित हॉटेल्स, लॉज आदी ठिकाणी तर काही स्पा सेंटर आधुनिक फॅशनेबल व ग्राहकांना गोंडस सेवा देण्याच्या नावाखाली हा गोरख धंदा राजरोसपणे शहराच्या मुख्य चौकात सुरू असल्याचे वारंवार समोर आले आहे. अशाच एका वेश्या‌ व्यवसाय सुरू असलेल्या औरा (Aura) स्पा सेंटरवर पोलिसांनी गिर्‍हाईक म्हणून पंटरला पाठवून धाड टाकली. या धाडीत व्यवसाय करणारे व करून घेणारे यांना रंगेहात पकडले. यावेळी पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली असून व्यवस्थापक, चालक व इतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, चार आरोपींपैकी सर्वच्या सर्व आरोपींनी पोलिसांना हुलकावणी चक्क पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली आहे. ही कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी दि.२ जून केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिकाऊ पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धाराशिव शहरातील प्रशासकीय इमारती चौकातील पंजाब नॅशनल बँकेसमोरील डी.आय.सी. रोड लगत असलेल्या औरा (Aura) स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (PITA) अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली. त्या कारवाईमध्ये शिकाऊ पोलीस उपअधीक्षक मोहिते, पोलीस निरीक्षक एम.एन. शेळके (AHTU), पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, पोलीस अंमलदार माने, दूधभाते, कंदळे, नाईकवडी, किवंडे, केवके, महिला पोलीस हवालदार पुरी, जाधव आणि चालक यांनी सहभाग घेतला. या कारवाई दरम्यान पंटरचा वापर करून खात्री करण्यात आली आणि शासकीय पंचांसमक्ष छापा टाकून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कारवाई दरम्यान औरा (Aura) स्पा सेंटरमध्ये व्यावसायिक लैंगिक शोषण (वेश्या व्यवसाय, अनैतिक देह व्यापार) सुरू असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी स्पा सेंटरचे व्यवस्थापक क्षितीज काकासाहेब मोरे (रा. गोवर्धनवाडी), चालक ओंकार अण्णासाहेब चोरमले (रा. गोवर्धनवाडी), अजित धोंडीराम लोमटे (रा. माळकरंजा) आणि रोहित रवींद्र गिरी (रा. ढोकी) ता. धाराशिव या आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ कलम ३, ४, ५ अन्वये धाराशिव शहरातील आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये एकूण ५ महिलांची सुटका (Rescue) करण्यात आली असून त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
           अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम तीव्र  जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सध्या विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याची विशेष जबाबदारी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक मोहिते यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या अंतर्गत बेकायदेशीर व अनैतिक कृत्यांवर कडक पाळत ठेवून तात्काळ कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. ही धडक मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरू राहील आणि अवैध व्यवसायांत सामील असलेल्या घटकांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलीस अधीक्षक खोखर यांनी दिला आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !