कात्राबाद शाळेत जिजाऊ, स्वामी यांची जयंती साजरी
कात्राबाद शाळेत जिजाऊ, स्वामी यांची जयंती साजरी
परंडा दि.१२ (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद प्रा.शाळा कात्राबाद येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सकाळी गावातून विविध घोषणा देत फेरी काढण्यात आली. यावेळी जिजाऊच्या वेशातील मुलींनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. नंतर शाळेत जिजाऊ व विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर मुलांना शाळेच्यावतीने खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष अमोल गरड, सदस्य विलास गरड, गोपीनाथ बोराडे, अलका गरड, ग्रामसेवक अशोक शिंदे, मुख्याध्यापक गोवर्धन अलबते, शिक्षक रवींद्र कापसे, अंगणवाडी सेविका चंद्रकला गरड, मदतनीस मीना बोराडे तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलबते यांनी तर आभार कापसे यांनी मानले.