रिन्यू पाॅवर कंपनीच्यावतीने विद्यार्थ्यांना ब्लॅंकेटचे वाटप
रिन्यू पाॅवर कंपनीच्यावतीने
तुळजापुर दि.१३ (प्रतिनिधी) - राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर येथील जय तुळजाभवानी माता प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना रिन्यू पाॅवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने ब्लॅंकेटचे वाटप दि.१२ जानेवारी रोजी करण्यात आले.
यावेळी शाळेतील मुलांसोबत संवाद साधत मुलांचा अभ्यास पाहून मुलांचे कौतुक केले. तर यापुढे असे कार्यक्रम सुद्धा आश्रम शाळेत घेतले जातील व विद्यार्थ्यांना पवनचक्की दाखवण्यासाठी घेऊन जाऊ असे आश्वासन कंपनीचे साईट मॅनेजर अजित पवार यांनी दिले. यावेळी कंपनीचे साईट मॅनेजर संजीव शिवाजी म्हेत्रे, वनपाल राहुल मारुती शिंदे, आबासाहेब शिंदे यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.