३ मोटारसायकलसह एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

 ३ मोटारसायकलसह एक आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
उस्मानाबाद दि.१२ (प्रतिनिधी) - लातूर उस्मानाबाद व नांदेड या जिल्ह्यातून मोटारसायकलची चोरी करणाऱ्या टोळीमधील एका हॉटेल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, लातूर येथील व्यंकट नारायण सितापुरे हे त्यांच्या मित्रांसह दि.१० जानेवारी रोजी ३ वाजण्याच्या सुमारास येडशी येथील लातूर- बार्शी रस्त्याने कार क्र. एमएच- २४ एएफ ३९११ मधून प्रवास करत होते. दरम्यान रस्ता खराब असल्याने कारचा वेग कमी झाल्याचा फायदा घेउन रस्त्याबाजूस उभा असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी कारमधील लोकांच्या नकळत कारच्या पाठीमागील डिकी कशानेतरी उघडून आतमधील एटीएम कार्ड, बँक पासबुक, कागदपत्रे व ७० हजार रुपये रोख रक्कम असलेली सुटकेस चोरुन नेली होती. या प्रकरणी व्यंकट सितापुरे यांनी दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेल्या तक्रारीवरून उस्मानाबाद (ग्रा.) पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. २०२/२०२२ हा भादंसं कलम- ३७९, ३४ अंतर्गत नोंदवला आहे.
हा गुन्हा तपासादरम्यान पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी- अंमलदार हे दि. ११ जानेवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, वाशी तालुक्यातील खामकरवाडी पारधी पिढी येथील अनिल आबा काळे याने त्याच्या अन्य तीन साथीदारांसह केला असून अनिल हा सध्या लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा येथे आहे. यावर पथकाने लागलीच तेथे जाउन त्यास ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुशंगाने त्याच्याकडे तपास केला असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने त्याच्या ताब्यातून नमूद गुन्ह्यातील चोरीच्या मालापैकी १२ हजार ५०० रुपये रक्कम हस्तगत करुन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्या ताब्यात तीन मोटारसायकली मिळुन आल्या. यावर पथकाने त्या मोटारसायकल सांगाडा व इंजीन क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास केला असता त्या तीन्ही मोटारसायकल जालना जिल्ह्यातील गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून, लातूर जिल्ह्यातील विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून व नांदेड जिल्ह्यातून चोरीस गेल्याअसल्याचे समजले. यावर पथकाने त्या तीन्ही मोटारसायकलसह नमूद रोख रक्कम असा एकूण ९२ हजार  रुपयांचा माल हस्तगत करुन अनिल यास ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यातील चोरीच्या एका गुन्ह्यासह जालना, लातूर व नांदेड जिल्ह्यांतील एकूण ३ चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला असून गुन्ह्यातील त्याच्या अन्य ३ साथिदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी  यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि यशवंत जाधव, पोउपनि संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार विनोद जानराव, प्रदीप वाघमारे, फरहान पठाण, नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर, महेबुब अरब यांच्या पथकाने केली आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !