प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत १४.३५ कि.मी. रस्त्यासाठी १२.३५ कोटी मंजूर झाले असल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत १४.३५ कि.मी. रस्त्यासाठी १२.३५ कोटी मंजूर - खा. राजेनिंबाळकर
उस्मानाबाद दि.१२ (प्रतिनिधी) - प्रधानमंत्री सडक योजना ३ अंतर्गत १४.३५ कि.मी. लांबीसाठी १२.८२ कोटी रुपये मंजूर करण्यासाठी लोकसभेत शून्य प्रकाराच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची आल्याची माहिती खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
दि.१३ डिसेंबर रोजी लोकसभेच्या १० व्या सत्राच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान शून्य प्रहरच्या माध्यमातून बोलताना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ३ या संदर्भामध्ये जिल्ह्यातील एकूण मंजूर असणाऱ्या रस्त्यांची लांबी व प्रत्यक्षात झालेली कामे यांची सरासरी टक्केवारी २.५४ इतकी नगन्य असल्याचे तसेच दि. २१ डिसेंबर रोजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची वास्तव परिस्थिती खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निदर्शनास आणुन दिली तसेच सदर रस्ते हे जड वाहतुकीमुळे लवकर खराब होत असून या योजनेंतर्गत होणाऱ्या रस्त्यांचा डीपीआर (अंदाजपत्रक) बनवत असताना जड वाहणांची वाहतुक ग्राह्य धरुन डीपीआर (अंदाजपत्रक) बनविण्याबाबत विनंती केली होती. तसेच जिल्ह्यातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याकरीता प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना यश येवून तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ पासून जळकोट-रामतीर्थ-रामनगर तांडा-यडोळा तांडा ते वागदरी लांबी ९.४५ किमी या रस्त्याकरीता ९.४२ कोटी तसेच लोहारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी ते हराळी हिप्परगा सय्यद ते एमडीआर ४५ लांबी ४.९ किमी या रस्त्याकरीता ३.५० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.