विद्यार्थी साहित्य स्पर्धेतील विजेत्यांना १८ जानेवारी रोजी बक्षिसांचे वितरण
विद्यार्थी साहित्य स्पर्धेतील विजेत्यांना १८ जानेवारी रोजी बक्षिसांचे वितरण
उमरगा दि.१३ (प्रतिनिधी) - तालुक्यातील येणेगूर येथे होत असलेल्या ५ व्या विद्यार्थी साहित्य संमेलनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून दि १८ जानेवारी रोजी संमेलनामध्ये या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना पारितोषिक वितरण केले जाणार आहे.
उमरगा गटशिक्षण कार्यालय व अभिजात साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या चार वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यंदा साहित्य संमेलनाचे पाचवे वर्षे असून या संमेलनानिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आलेल्या साहित्यामधून कवी संमेलन व कथाकथनसाठी विद्यार्थीची निवड केली जाणार आहे. या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय, उत्तेजनार्थ विद्यार्थी व कंसात शाळा पुढील प्रमाणे - काव्य लेखन स्पर्धेत प्रसाद कुंभार, (शिवशक्ती विद्यालय, एकुरगा.), पल्लवी पोतदार, (भारत विद्यालय, उमरगा.) तेजस डिग्गीकर, (के डी शेंडगे इंग्लिश स्कूल), समीक्षा फुगटे, (ग्रामीण प्रशाला माडज व व तनिष्का संपत झांबरे जि प प्रा शा, कोरेगाव).
कथालेखन स्पर्धा- प्रार्थना शिंदे, (कै शरणप्पा मलंग विद्यालय), पृथ्वी जाधव (ग्रामीण प्रशाला, माडज), रोहिणी जाधव, (जिप कन्या प्रशाला मुरूम), आदिती रेड्डी (कै शरणप्पा मलंग विद्यालय) व आशुतोष खंडाळकर (लोटस पोद्दार लर्न स्कूल) काव्य स्पर्धेमध्ये
तर निबंध स्पर्धेत आदिती वासगी, (श्री ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी), प्राजक्ता सुतके (कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येणेगुर), सृष्टी बिराजदार (भारत विद्यालय उमरगा), तनया सोमवंशी (डॉ के डी शेंडगे इंग्लिश स्कूल) व शिवकन्या शेवाळकर (जिप प्रा.शा. बेळंब) तसेच चित्रकला स्पर्धेत श्रीपाद तळीखेडे (भारत विद्यालय), दर्शना राठोड, (महात्मा गांधी विद्यालय उमरगा), राजलक्ष्मी पाटील (महात्मा बसवेश्वर विद्यालय, उमरगा), ऐश्वर्या कांबळे (श्री भाऊसाहेब बिराजदार स्मारक विद्यालय, येळी) व धानेश्वरी पाटील, (कॅ. जोशी स्मारक विद्यालय येणेगूर) विजयी झाले आहेत.
सर्व विजेत्या शालेय विद्यार्थ्यांचे गटशिक्षण कार्यालय व अभिजात साहित्य मंडळ यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.