युवकांनी कौशल्य आत्मसात करून उद्योजक बनावे - चिवटे

युवकांनी कौशल्य आत्मसात करून उद्योजक बनावे - चिवटे

कळंब दि.१३ (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांनी आयटीआयचे शिक्षण घेऊन कौशल्य आत्मसात करून छोटे छोटे उद्योग निर्माण करून स्वंय रोजगाराची निर्मिती करुन स्वतःच्या पायावर उभे रहावे असे आवाहन मंगेश चिवटे यांनी केले. ते कळंब येथील धनेश्वरी शैक्षणिक संकुलाच्या शाखेत बोलत होते.
 डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.१० जानेवारी रोजी मुख्यमंत्री यांचे स्विय सहाय्यक व राज्याचे वैद्यकीय मदत सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सदिच्छा भेट दिली.
पुढे बोलताना चिवटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात लाज न बाळगता आपल्या कौशल्य व बुद्धीच्या जोरावर प्रगती करावी. तसेच वैद्यकीय क्षेत्रात कोणालाही कसलीही अडचण आली असता त्यांनी संपर्क साधून आरोग्य विषयक सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना त्यांची ओळख देखील करून दिली. यावेळी उद्योजक चेतन कात्रे, भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे, प्रा.श्रीकांत पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, प्रा.मोहिनी शिंदे-चोंदे, निदेशक सागर पालके, निदेशक अविनाश म्हेत्रे, निदेशक विनोद जाधव, अतिश वाघमारे, विनोद कसबे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !