स्वयंम् शिक्षण प्रयोगच्या व्यवसायिकता विकास मेळाव्यास उस्मानाबाद, लातूर व सोलापूर जिल्ह्यातील ५७५ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
स्वयंम् शिक्षण प्रयोगच्या व्यवसायिकता विकास मेळाव्यास ५७५ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
उस्मानाबाद दि.१३ (प्रतिनिधी) - स्वयं शिक्षण प्रयोगच्यावतीने पुष्पक मंगल कार्यालयात गाव पातळीवर काम करणाऱ्या स्वयंम सखी व प्रेरणा सखी यांचा व्यवसायिकता विषयावर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास उस्मानाबाद, लातूर व सोलापूर जिल्ह्यातील ५१० गावातील ५७५ महिलांनी सहभाग नोंदविला.
या मेळाव्यात सिस्टमा बायोचे कंपनीचे कार्यक्रम संचालक पियुष सोहनी,अतुल मित्तल, सचिन कोतंबीरे, चिंतामणी दांडेकर, सुमन शर्मा, अनिकेत शिंदे, भारतीय स्टेट बँकेचे सुहास माने, रस्तुगी स्वयंम शिक्षण प्रयोगचे कार्यक्रम संचालक उपमन्यू पाटील, उप कार्यक्रम संचालक नसीम शेख, कार्यक्रम व्यवस्थापक तबसुम मोमीन, किरण माने, काका अडसुळे, विकास कांबळे, दीपक लांडगे जिल्हा समन्वयक बाळासाहेब काळदाते राजाभाऊ जाधव माधव गोरकटे देवकन्या जगदाळे सोलापूर उस्मानाबाद व लातूर जिल्यातील महिला फार्मर प्रोडूसर कंपनीचे डायरेक्टर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंशिक्षण प्रयोग चे कार्यक्रम संचालक उपमन्यू पाटील यांनी ३ जिल्यातील ४५० गावातील शेतकरी महिलांना सवलतीच्या दरात बायोगॅस मिळून दिले जात आहेत या बदल माहिती दिली बायोगॅस आणि शेंद्रिय शेती बायोगॅस आणि महिलांचे आरोग्य बायोगॅस आणि पर्यावरण या बदल मार्गदर्शन केले सिस्टमा बायो कंपनीचे कार्यक्रम संचालक यांनी बायोगॅस शेतकऱ्यांची कशी गरज आहे. बायोगॅस मुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कशी मदत होणार आहे हे पटवून दिले. अनिकेत शिंदे यांनी बायोगॅसचे फायदे समजून सांगितले. बायोगॅस व सब्बजी कुलर वापराचे अनुभव कथन केले संजीवनी महाजन देवळाली, शिवकण्या टोणगे, लोहाटा, नवशाद शेख, कोमल पवार यांनी बायोगॅस तर भाजीपाला मूल्यसाखळी यावर अश्विनी कोरके, रंजना कदम यांनी व ग्रुप डेरी संकल्पना सांगितली. तसेच प्रमोथिनचे मोहन पाटील व स्वयंम शिक्षण प्रयोगच्या तबसुम मोमीन यांनी उपस्तीत महिलाना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव गोरकट्टे व प्रशांत डांगे यांनी तर आभार बाळासाहेब काळदाते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश लष्करे, दत्ता मोरे, दयानंद अंजना, अंजना साबळे, शिल्पा वलदोडे, अंजली झाडके, सीमा सय्यद, शाहेदा मुजावर, रोहिणी घोडके सुजाता पाटील आदींनी सहभाग घेतला.