राजमाता जिजाऊ व स्वविवेकानंद स्वामी जयंती दिनी जिप शाळा आळणी येथे भाषण स्पर्धा पडली पार
जिजाऊ व स्वामी जयंतीदिनी जिप शाळेत भाषण स्पर्धा पडली पार
उस्मानाबाद दि.१३ (प्रतिनिधी) - तालुक्यातील आळणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद शाळा व शिवनेरी मित्र मंडळ यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये इयत्ता ८ वी ते १० वी तर ५ वी ते ७ वी व लहान गट म्हणून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या जिजाऊ व स्वामी वीवेकानंद यांच्या जीवकार्यावर भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता जिजामाता व समाजसुधारक स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर प्रास्ताविक मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी केले. यावेळी काही जणांनी तर तेथेच रोख बक्षीस दिले. भाषण स्पर्धेतील विजेत्यांना येत्या प्रजासत्ताक दिनी रोख स्वरूपात शिवनेरी मित्रमंडळाच्यावतीने पारितोषिके वाटप केली जाणार असल्याचे जाहीर केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तथा शिवनेरी तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष धर्मराज सूर्यवंशी उपस्थित होते. तसेच उद्घाटक म्हणून सरपंच प्रमोद वीर उपस्थित होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजयकुमार नांदे, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौगुले, शिवसेनेचे धनंजय वीर, श्रीपाल वीर, अजित वीर, अजय देशमुख, निलेश कदम, दादासाहेब गायकवाड, पोपत सुरवसे, रोहन घटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्त्याशिला म्हेत्रे यांनी केले. यावेळी शिक्षिका वर्षा डोंगरे, सुनिता कराड, नरवटे, ढगे, मते, वीर व श्री हनुमंत माने सहकार्य केले. यावेळी जीवनराव गोरे विद्यालयातील सर्व शिक्षक व गावातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवनेरी मित्र मंडळाच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले. जीवनराव गोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र मडके यांनी आभार मानले.