प्रतिभा रामराव काळे यांनी खडकाळ, ओसाड माळरानावर फुलविला बागेचा मळा
इक्बाल मुल्ला
लोहारा दि.१३ - सहसा माळ रानाच्या शेतीवर पावसाळ्यात येणाऱ्या पिका व्यतिरिक्त इतर पिकेच घेतली जात नाहीत. खडकाळ माळ रानावर रानावर तर ती पिकांऐवजी गवतच मोठ्या प्रमाणात व दिमाखात वाढते. मात्र पिके देखील व्यवस्थित येत नाहीत. लोहारा तालुक्यातील फणेपूर येथील प्रतिभा रामराव काळे या ७२ वर्षीय महिलेने बाग फुलविल्यामुळे ओसाड माळरान बहरुन गेले आहे.
तुळजापुर व लोहारा तालुक्याच्या शिवेवरुन बालाघाट पर्वताची रांग गेलेली असून या डोंगराच्या पायथ्याशी प्रतिभा काळे यांची ५ एकर शेत जमीन आहे. या शेतात कुशळाशिवाय काहीच येत नाही. शेतात २ विंधन विहिरी, एक सिंचन विहीर व २ शेततळे आहेत. त्यामुळे पाण्याची व्यवस्था झाली आहे. राज्य सरकारने नियोजित २ वृक्ष लागवड अभियान अंतर्गत याचे औचित्य साधून चिंच, कडुलिंब, आवळा, अशोका व नारळ आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. आंब्यासह एकूण १०१५ झाडे उभे आहेत. या शेतकरी महिलेने जोड व्यवसाय म्हणून फळबागेत सोयाबिन, हरभरा व दुग्ध पालन, मत्स्य पालन, शेळी पालन, कुक्कुट पालन, गांडुळ खत आदी उदरनिर्वाहसाठी व्यवसाय सुरु कले आहेत. यापासून साधारण वार्षिक अडिच लाख रुपये नफा मिळत आहे. या महिलेने पती रामराव काळे, मुलगा नितीन काळे, माजी कृषी अधीक्षक दशरथ तांबाळे, जिल्हा कृषी अधिक्षक शिरीष जमदाडे, बिराजदार, माजी तालुका कृषी अधिकारी कुलकर्णी, गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम सुधारीत शेती करुन चांगले उत्पन्न काढीत आहेत. यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेऊन अशी सुधारीत शेती करावी. कृषी खात्यातील अधिकारी व सहकारी हे वेळोवेळी बागेत येऊन मार्गदर्शन करीत असतात. उस्मानाबाद आकाशवाणी केंद्र प्रमुख यांनी फळबागेची पाहणी करुन मुलाखत प्रसारित केली. आंबा फळबाग व इतर पिके (ऑरगॅनिक) सेंद्रिय खतांचा वापर करून गांडुळ खत निर्मिती जिवामृत, दसपरणी अर्क, लिंबोळी अर्क, कंपोस्ट खत याची निर्मिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय आर्थिक ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, परंपरागत कृषी विकास योजना व तुलसी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय निविष्ठा उत्पादक कार्यशाळा आदी कार्यक्रम या बागेत घेण्यात आले. तर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने दि.१ जुलै कृषी दिन २०२२ निमित्त प्रतिभा रामराव काळे यांनी शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर दि.१ जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. त्यामध्ये जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.