एकलव्य आश्रम शाळेच्या ९ विद्यार्थीनींची राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड

एकलव्य आश्रम शाळेच्या ९ विद्यार्थीनींची राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड


उस्मानाबाद दि.१२ (प्रतिनिधी) - जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या लातूर विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धामध्ये एकलव्य आश्रम शाळा मंगरूळ यमगरवाडीतील २८ विद्यार्थ्यांनी विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी ९ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. यामध्ये ३ हजार मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये प्रणिता गाडेकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. दीड हजार मीटर धावणे या क्रीडा प्रकारांमध्ये ईश्वरी तेली हिने प्रथम क्रमांक मिळवला. व ४ हजार ४०० बॅटन दिले. या क्रीडा प्रकारामध्ये प्रणिता गाडेकर, ईश्वरी तेली, शितल गायकवाड,कल्पना जाधव आणि सोनाली गिरी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर ४ किमी क्रॉस कंट्री या क्रीडा प्रकारांमध्ये शितल गायकवाड व ईश्वरी तेली यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंची पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडू व क्रीडा विभाग प्रमुख बालाजी क्षीरसागर, महादेव शेंडगे, क्रीडा प्रशिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर यांचे संस्थेच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र वैदू, कार्यवाह, विवेक आयचीत, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे, संस्थेचे संचालक मंडळ व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !