जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु


 
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु 
उस्मानाबाद दि.७ (प्रतिनिधी) - नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा, प्रशासनात लोकाभिमुखता यावी, कारभार पारदर्शक व्हावा या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष डिसेंबरपासून सुरु करण्यात आली असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.७ फेब्रुवारी रोजी दिली. 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, या कक्षाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर असेल. जिल्हा पातळीवर कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, ग्रामीण भागातील प्रश्न तातडीने सुटावे या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत. त्यानुसार या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात मुख्यमंत्र्यांना उद्देशून असलेले अर्ज, निवेदन, तक्रार स्विकारण्यात येतील. तर संबंधितांना पोहच पावती दिली जाईल. तसेच आलेली तक्रार तातडीने संबंधित विभागाकडे वर्ग केली जाणार असून जिल्हाधिकारी कक्षाच्या कामाचा आढावा दर महिन्याच्या लोकशाही दिनात घेण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !