पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांची पत्रकारांनी घेतली सदिच्छा भेट
पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांची पत्रकारांनी घेतली सदिच्छा भेट
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांची पत्रकारांनी पुणे येथील कात्रज भागात असलेल्या त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी धाराशिव दवंडीचे संपादक वैभव पारवे, दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन सोनवणे, उस्मानाबाद २४ तासचे संपादक तथा व्हाईस ऑफ मीडियाचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, तेरणेचा छावाचे संपादक पांडुरंग मते व उस्मानाबाद न्युजचे संपादक सलीम पठाण आदी उपस्थित होते.