कसबे तडवळे येथील महार-मांग वतनदार परिषदेत पत्रकारांचा सत्कार

कसबे तडवळे येथील महार-मांग वतनदार परिषदेत पत्रकारांचा सत्कार

उस्मानाबाद दि.२२ (प्रतिनिधी) - तालुक्यातील कसबे तडवळे येथे दि.२२-२३ फेब्रुवारी १९४१ साली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन महार-मांग वतनदार परिषद घेतली होती. या ऐतिहासिक घटनेचा ८२ वा वर्धापन दिन असून त्यानिमित्त कसबे तडवळे येथे पत्रकारांचा दि.२२ फेब्रुवारी रोजी सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे पत्रकारांचा आ. कैलास पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पंचशील ध्वज देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रहीम शेख, पांडुरंग मते, प्रा सतीश मातने, कुंदन शिंदे व सलीम पठाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, ॲड जिनत प्रधान, फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयशील भालेराव, चंदू भालेराव, विजय बनसोडे आदी उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !