अपर जिल्हाधिकारी शिंदे यांच्या डोक्यावर संदल देऊन ऊर्सास प्रारंभ
अपर जिल्हाधिकारी शिंदे यांच्या डोक्यावर संदल देऊन ऊर्सास प्रारंभ
उस्मानाबाद दि.७ (प्रतिनिधी) - शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे. ऊर्साचा प्रारंभ संदल मिरवणुकीने अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या डोक्यावर देऊन दि.७ फेब्रुवारी रोजी प्रारंभ करण्यात आला.
उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे. ऊर्साचा मान शहरातील अरब गल्लीतील अरब मज्जिद येथून निघणाऱ्या संदलने करण्यात येतो. हा मान जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतो. मात्र जिल्हाधिकारी उपस्थित नसल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांना तो देण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उप विभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसिलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक उस्मान शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण, जिल्हा वक्फ अधिकारी अहमद खान, सज्जादा दर्गाह शरीफ इक्रामुल्ला हुसेनी, मोहसीन शेख आदी उपस्थित होते. ही संदल मिरवणूक अरब गल्ली मार्ग जिल्हाधिकारी पोस्ट चौक, सावरकर चौक, मारवाड गल्ली, काळा मारुती चौक, नेहरू चौक, आजाद चौक, विजय चौक मार्गे दर्गाह येथे काढण्यात आली. यावेळी आ. कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वासआप्पा शिंदे, संजय निंबाळकर, मसूद शेख, सिद्धार्थ बनसोडे, शमीयोद्दिन मशायक, गफार मुजावर सय्यद यासिद आदींसह सर्व समाजातील मानकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर ही मिरवणूक ढोल ताशांच्या दणदणाटात व फटाक्यांची आतषबाजी काढण्यात आली.