विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी शिक्षण दर्पण पोर्टल सुरु करणार - राहुल गुप्ता

विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी शिक्षण दर्पण पोर्टल सुरु करणार - गुप्ता यांनी दिली.

उस्मानाबाद दि.६ (प्रतिनिधी) - विद्यार्थी सर्व बाबतीत प्रगत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. निती आयोगाच्या शैक्षणिक निकषांमध्ये देशात अव्वल ठरला असून त्यासाठी शिक्षक विद्यार्थी व पालकांचे सहकार्य लाभले आहे. शैक्षणिक क्षेत्राचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद विद्यार्थी सर्व बाबतीत प्रगत करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता पालकास तपासता यावी यासाठी शिक्षण दर्पण पोर्टल सुरू करणार असल्याची विशेष माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दैनिक यशवंतशी बोलताना दिली.
पुढे बोलताना गुप्ता म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक व द्विभाषिक पुस्तके मंजूर करण्यात आली होती. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अशा प्रकारे शैक्षणिक उपक्रम राबविणारा उस्मानाबाद हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले. जी भाषिक पद्धत विद्यार्थ्यांना पटवून तर दिलीच. शिवाय गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी त्या मुलांनी शाळेत यावे व जी मुले आजपर्यंत शाळेच्या बाहेरच आहेत. ज्यांनी कधीही शाळेत प्रवेश नोंदणी केलेली नाही अशी ४७ मुले व सतत १०-१० दिवस गैरहजर राहणाऱ्या १०० मुलांना शाळेत आणण्यासाठी विशेष अभिमान राबविले. त्यामुळे नीती आयोगाच्या निकषात या अभियानास बऱ्यापैकी यश आले. तर शाळा सुरू झाल्यापासून एक महिन्याच्या आत जिल्हा परिषदेच्या शाळेसह खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना शंभर टक्के शालेय पुस्तकांचे १०० टक्के वितरण करण्यात आले. तसेच गुणवत्ता आदर्श शाळा प्रकल्प ८७ शाळेमध्ये राबवून स्वतंत्र वाचनालय, स्वयंपाक‌ गृह, खेळाचे मैदान व वातानुकूलित खोल्या अशा आदर्श मॉडेल वर्गखोल्या करण्यात आल्या.

चौकट

कसबे तडवळा शाळेच्या धर्तीवर इतर शाळा तयार करु

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषदेची शाळा उन्हाळी सुट्टी न घेता सतत १२ महिने सुरू असते. त्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी अतिशय मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थी स्कॉलरशिप, नवोदय या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत आहेत. या शाळेच्या धर्तीवर इतर शाळा तयार करण्यासाठी प्रयत्न करणार का ? असे विचारले असता त्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. तसेच त्यासाठी विशेष बैठक घेऊन कशा पद्धतीने जिल्हा परिषदेच्या इतर शाळा आदर्श ठरतील ? असा यासाठी प्रयत्न करणार असल्याची त्यांनी सांगितले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !