शंभूराजे महानाट्यासाठी मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यातनागरिकांसाठी मोफत पाहण्याची सुविधा २० हजार नागरिकांना बसण्याची व्यवस्था

शंभूराजे महानाट्यासाठी मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात
नागरिकांसाठी मोफत पाहण्याची सुविधा

२० हजार नागरिकांना बसण्याची व्यवस्था

उस्मानाबाद दि.८ (प्रतिनिधी) - अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, श्रीमंत योगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, उस्मानाबादच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रा. नितीन बानगुडे-पाटील लिखित एक धगधगते शंभुराजे हे महानाट्य उस्मानाबाद येथे प्रथमच सादर केले जाणार आहे. त्यासाठी मंडप उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी प्रा नितीन बानगुडे-पाटील लिखित शंभूराजे हे तीन भागात म्हणजे सलग तीन दिवस चालणारे महानाट्य उस्मानाबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूल (जिल्हा परिषद कन्या प्रशाला) या मैदानावर दि. ११, १२ व १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे. यासाठी १०० x ६० फुट स्टेज उभारण्यात येत असलेल्या मंडपाची पाहणी करण्यात येत आहे. हे नाटक पाहण्यासाठी २० हजार महिला व पुरुष बसतील या क्षमतेच्या खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र १० बेरिंकेटिंग कक्ष तयार करण्यात आले आहेत. तसेच स्टेटच्या मागे बॅक ग्राऊंड, मैदानावर लाईटची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे लाईट गेली तर जनरेटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व वाहन पार्किंगची व्यवस्था जुन्या अग्निशमन दलाच्या पाठीमागील मैदानावर करण्यात आली आहे. याची पाहणी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत यांनी केली. यावेळी अथर्व निंबाळकर, आकाश सर्जे, सौरभ गायकवाड, किशोर राऊत, राजेश बंडगर, प्रकाश घायाळ आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष धनंजय राऊत यांनी केले आहे.

या महानाट्याचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्यासह इतर मान्यवर तर दि.१२ फेब्रुवारी रोजी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री बसवराज पाटील व विश्वासआप्पा शिंदे आदींसह इतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच दि.१३ फेब्रुवारी रोजी आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे व माजी चेअरमन ब्रिजलाल मोदी आदींसह इतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर दि.१५ फेब्रुवारी रोजी आकर्षक एलईडी व लेजर लाइटिंग शोचे उद्घाटन जिपचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड मिलिंद पाटील तर बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके आदींसह इतर उपस्थित राहणार आहेत. तसेच दि.१५ फेब्रुवारी रोजी ध्वजारोहणचे उद्घाटन खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ कैलास पाटील तर प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची राहणार आहे. तर दि.१८ शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा सिने अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून याचे उद्घाटन यशोदा परिवाराच्या सुप्रिया सस्ते यांच्या हस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्मिता ओंबासे उपस्थित राहणार असून यावेळी मुख्याधिकारी वसुधा फड या प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच दि.१९ सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी व अभिवादन करण्यात येणार असून याचे उद्घाटन पालकमंत्री प्रा डॉ सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर अध्यक्षस्थानी आमदार राणा जगजितसिंह पाटील व प्रमुख उपस्थित म्हणून माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह इतर उपस्थित राहणार आहेत. तसेच सकाळी १० वाजता जिजामाता उद्यान येथे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या हस्ते शिव मूर्तीचे पूजन करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील व प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे यांच्यासह इतर उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणुकीचा शुभारंभ खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ राणाजगजिसिंह पाटील तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून अ.भा. मराठा महासंघाचे प्रकाश जगताप व प्रमुख उपस्थिती म्हणून आ कैलास पाटील, विश्वासआप्पा शिंदे व भारत कोकाटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !