हत्तीबेट येथे सुविधा उपलब्ध करुन देण्यासह वन मजुरांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरु

हत्तीबेट येथे सुविधा उपलब्ध करुन देण्यासह वन मजुरांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरु

उस्मानाबाद दि.१६ (प्रतिनिधी) - लातूर जिल्ह्यातील ब वर्गीय पर्यटन हे वनविभागाच्या ताब्यात आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या रोपवाटीकेवरील मजुरांकडून झाडांना, रोपांना पाणी देणे, लागवड केलेल्या रोपांची निंदणी, खुरपणी करणे व हत्ती बेटावर दररोज येणाऱ्या पर्यटक भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता व अन्य सुखसोयी उपलब्ध करुन देण्याचे काम केले जाते. मात्र वन विभागाचे वनरक्षक, वन परिमंडळ अधिकारी व वनपरिक्षेत्र अधिकारी हे ६-६ महिने हत्तीबेटाला भेट देत नसल्यामुळे या कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. सध्या रोप वाटीकेचे काम बंद असल्यामुळे मजूरांची उपासमार सुरु आहे. शिवाय मागील ६० दिवसांची मजुरी वन मजुरांना अद्यापपर्यंत मिळालेली नाही. तसेच त्या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी हत्तीबेट विकास समितीच्यावतीने विभागीय वन अधिकारी कार्यालयासमोर दि.१६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
हत्ती बेटावर सेंट्रल नर्सरी सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दोन वेळा वन परिक्षेत्र अधिकारी, अहमदपूर यांना पत्र देऊनही त्यांनी या कामाचे अंदाजपत्रक मंजूरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेले नाही. हत्ती बेटावर पर्यटन विकासाची कामे करण्यासाठी वन विभागाकडून कृती आराखडा, अंदाजपत्रके व पर्यटन विभागाकडे निघोची मागणी केली जात नाही. तसेच हत्ती बेटावर रोज दोन ते चार शाळांच्या सहली व पर्यटक, भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे येथील स्वच्छता या ठिकाणी सुरु असलेल्या रोपवाटीकेवरील काम करणा-या मजूरांकडून स्वच्छता करावीच लागते. जून महिन्यात लागवड केलेल्या ५ एकर जमिनीवरील वृक्षांची देखभाल आजपर्यंत केली नसल्यामुळे ही झाडे नामशेष झाली आहेत. आज या नामशेष झालेल्या जागेवर नवीन झाडे लावण्यासाठी टेंपोमधून झाडे हत्ती बेटाला आणण्यात आली आहेत. त्यामुळे येथील विकास कामांचा पुरता बोझवारा उडालेला आहे. मजूरांना काम नसल्यामुळे मजूरांची उपासमार सुरु आहे. शिवाय या मजूरांकडून येथील सुरु असलेले स्वच्छतेचे व सुरक्षेच्या जबाबदारीची कामे बंद आहेत. यामुळे हत्तीबेटाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे  हत्तीबेटावर सुरु असलेल्या दोन्ही रोपवाटीकेचे काम सुरु करुन मजूरांना काम तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे, हत्तीबेटावर सेंट्रल नर्सरी सुरु करुन या भागातील मजूरांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करून द्यावा. हत्तीबेट विकास कामांचा बृहत आराखडा, विकास कामांची अंदाजपत्रके तात्काळ तयार करुन पर्यटन विभागाकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे  निधीची मागणी करण्यात यावी. हत्तीबेटावर काम करणाऱ्या मजूरांकडून काम करुन घेण्यासाठी वनरक्षकास हत्तीबेटावर दररोज येण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे. हत्तीबेटावर काम केलेल्या मजूरांच्या मागील थकीत ६० दिवसांची मजूरी तात्काळ देण्यात यावी. तर नवीन दोन रोपवाटीकेची अंदाजपत्रके तात्काळ तयार करुन त्यास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी व हत्तीबेटावरील उर्वरीत शिल्लक क्षेत्रावर नवीन वृक्ष लागवड करण्यात यावी आदी मागण्यांसाठी हत्तीबेट विकास समितीचे अध्यक्ष व्ही.एस. कुलकर्णी, राम बोंबिले, गणेश चव्हाण, विष्णू संपते, लक्ष्मण यलगट्टे, बाबू राठोड, अण्णाराव पिटले, सरोजा बोंबिले, दशरथ बंडगर, राम बतले, सुमन चव्हाण, कविता चव्हाण, सुचिता राठोड, रेणुका चव्हाण, सुनिता चव्हाण, सुरेखा चव्हाण, जयदेवी माचोळे, महानंदा माचोळे, श्वेता पालेवाड, स्मिता कांबळे, क्रांती सुर्यवंशी, संदिपान सुर्यवंशी आदीसह इतर मजूरांनी उपोषण सुरु केले आहे. तसेच आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु राहील असा इशारा त्यांनी दिला आहे. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !