तेरखेडा येथे फटाका क्लस्टर तर भूम, परंडा वाशी, शिराढोण येथे एमआयडीसी होणार पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत उदयोग मंत्री सामंत यांची घोषणा
- Get link
- X
- Other Apps
तेरखेडा येथे फटाका क्लस्टर तर भूम, परंडा वाशी, शिराढोण येथे एमआयडीसी होणार
पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत उदयोग मंत्री सामंत यांची घोषणा
उस्मानाबाद.दि.१० (प्रतिनिधी) - वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे फटाका क्लस्टर तर भूम, परंडा, वाशी व शिराढोण येथे एमआयडीसी उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत एक्स्प्रेस टॉवर नरीमन पॉईट मुंबई येथे झालेल्या बैठकीत घोषणा केली.
उस्मानाबाद जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलून राज्यात तो औद्योगिक दृष्ट्या प्रगत करण्याच्या उद्देशाने हा महत्वपूर्ण निर्णय असल्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात एमआयडीसीच्या माध्यामातून उद्योग खेचून आणत जिल्ह्यातील नागरिकांना नोकऱ्या, रोजगार व त्यामधून आर्थिक विकास साधण्यासाठी दूरदृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे डॉ.सावंत यांनी सांगितले. तर आर्थिक विकासापाठोपाठ विविध पुरक व्यवसाय व पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचे यामागे धोरण आहे. तसेच तेरखेड्याची राज्यातच नव्हे तर देशामध्ये फटाका उत्पादनाच्या बाबतीत ओळख आहे. ही ओळख, स्थानिकांचे कौशल्य व या ठिकाणचा पारंपारिक व्यवसाय याचा विकास होण्यासाठीच फटाका क्लस्टरची निर्मिती करण्यात येणार आहे. या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार व फटाका बाजारपेठेत तेरखेड्याचे अढळ स्थान निर्माण होईल. हे निश्चितच उस्मानाबाद जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक विकासास पोषक पुरक व पुढे घेऊन जाणार याची मला खात्री असल्याचे डॉ.सावंत यांनी सांगितले.
- Get link
- X
- Other Apps