ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा लटके यांचा शिंदे गटामध्ये प्रवेशठाकरे गटाला पडले मोठे भगदाड

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा लटके यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश
ठाकरे गटाला पडले मोठे भगदाड

उस्मानाबाद दि.१९ (प्रतिनिधी) - शिवसेना (शिंदे) मध्ये विविध पक्षांतील नेते व कार्यकर्ते जाहीर प्रवेश करीत आहेत. त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उस्मानाबाद जिल्हाप्रमुख प्रा गौतम लटके यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत दि.१९ मार्च रोजी जाहीर प्रवेश केला. त्यामुळे परंडा तालुक्यात शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. तर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मागे खंबीरपणे साथ देणारे नेते पक्षाला राम राम ठोकून शिवसेनेत प्रवेश करीत असल्यामुळे शिवसेनेला बळकटी मिळणार आहे. येणाऱ्या काळात आणखी किती मावळे ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात डेरे दाखल होतात याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !