सिलिंग व इनामी जमिन धोरणासाठी मंत्री सावंत यांच्या उपस्थितीत बैठक पडली पार
सिलिंग व इनामी जमिन धोरणासाठी मंत्री सावंत यांच्या उपस्थितीत बैठक पडली पार
उस्मानाबाद दि.१० (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील सिलिंग व इनामी जमिनीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री, प्रा.डॉ. तानाजीराव सावंत व जिल्ह्यातील इतर आमदारांच्या उपस्थितीत विधान भवन मुंबई येथे दि.९ मार्च रोजी बैठक पार पडली.
धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकरी व भूखंड धारकांच्या जमिनी महसूल प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता वर्ग १ च्या, वर्ग २ मध्ये रूपांतरित केल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहेत. ना. प्रा डॉ सावंत यांनी महसूल प्रशासनाच्या चुकीमुळे सर्वसामान्य शेतकरी व भूखंड धारकांना त्रास होत असल्यामुळे या जमिनी पुन्हा वर्ग २ च्या वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत माननीय महसूल मंत्र्यांना विनंती केली. महसूल प्रशासनाने सदर जमिनी पूर्ववत वर्ग १ करण्यासाठी शेतकऱ्यांना अवास्तव दंडाच्या नोटीस दिल्या आहेत. जे की अन्यायकारक आहे. त्यामुळे काही नाममात्र रक्कम भरून घेऊन सदर जमिनी वर्ग १ करणेबाबत निर्णय घेण्याबाबत महसूल मंत्री यांना पालकमंत्र्यांनी विनंती केली व याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री विखे-पाटील यांनी दिली.