पारा येथे प्रशांत चेडे यांच्या हस्ते हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन हरभऱ्याची हमीभावाने खरेदी सुरु
पारा येथे प्रशांत चेडे यांच्या हस्ते हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन
हरभऱ्याची हमीभावाने खरेदी सुरु दि.२२ (प्रतिनिधी) - तालुक्यातील पारगाव येथील मांजरा फार्मर प्रोडूसर कंपनी संचलित हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत चेडे यांच्या हस्ते दि.२२ मार्च रोजी करण्यात आले.
शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत होती. त्यामुळे हरभरा खरेदी केंद्र सुरु करावीत अशी मागणी शेतकऱ्यासह विविध पक्षाच्यावतीने करण्यात येत होती. वाशी तालुक्यातील पारा येथे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याच्या खरेदीचा पाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. यावेळी नितीन चेडे, नागनाथ नाईकवाडी, शिवहर स्वामी, विठ्ठल कवडे, पांडुरंग आखाडे, मुकुंद आखाडे, उमेश आखाडे, राजेश आखाडे, मनोज पाटील, महादेव आखाडे, लक्ष्मणराव ढेपे, दत्ता जाधव, प्रशांत बाबा चेडे मित्र मंडळाचे सदस्य व शिवसेना पदाधिकारी व शेतकरी मोठ्या उपस्थित होते.