सोलरचे काम करु देण्यासाठी महिला सरपंचाच्या पतीने घेतली एक लाख रुपयांची लाच महिलेच्या नावे गाव कारभार हाकतो पती, त्याची होणार अशीच अधोगती

सोलरचे काम करु देण्यासाठी महिला सरपंचाच्या पतीने घेतली एक लाख रुपयांची लाच

महिलेच्या नावे गाव कारभार हाकतो पती, त्याची होणार अशीच अधोगती

उस्मानाबाद दि.२३ (प्रतिनिधी) - जल जीवन मिशन अंतर्गत तीन गावांमध्ये सौर उर्जेंवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेच्या सुरु असलेल्या कामांना अडवून ती पुन्हा सुरू करायचे असतील तर दीड लाख रुपये लाचेची मागणी केली. मात्र तडजोडी अंती एक लाख रुपयांवर तडजोड करून लाचेची रक्कम स्विकारणारा सरपंच पती हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून त्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. गावचा विकास करावा यासाठी महिलेला सरपंच म्हणून गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. मात्र सार्वजनिक विकासाची कामे करताना देखील महिला सरपंच पतीने अशी लाचखोरी करून गाव विकासामध्ये अडकाठी आणण्याचे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर निलंबनाची कारवाई होणे आवश्यक आहे. दरम्यान, ज्या महिलेच्या नावे गाव कारभार हाकतो पती, त्याची होणार अशीच अधोगती अशीच चर्चा जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये दिवसभर चवीने सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, परंडा तालुक्यातील रोहकलसह इतर वस्तीवर मेनकर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जल जीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेंवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेचे १८ लाख रुपये किंमतीची काम सुरु आहेत. मात्र रोहकल येथील सरपंच कोलते या महिलेचे पती हनुमंत पांडुरंग कोलते (वय- ४३ वर्षे, व्यवसाय- शेती) यांनी ती कामे बंद केली होती. तसेच या कंपनीमध्ये साईट सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेल्या एका ३५ वर्षीय कर्मचाऱ्याकडे तुम्ही ३ गावांमधील सुरु असलेल्या कामांचे प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे दीड लाख रुपये किंवा सोलरच्या ३ प्लेटा व त्याचे साहित्य आदी लाचेची मागणी केली. तडजोडी अंती दि.२२ मार्च रोजी १ लाख रुपये लाच घेण्याचे मान्य करून ती लाच दि.२३ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या कॅन्टीनमध्ये ती लाचेची रक्कम पंचा समक्ष स्विकारली. लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरपंच पती कोलते यास रंगेहात पकडून उचल बांगडी केली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई औरंगाबाद येथील लाचलुचप

त प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (मो.नं. ९९२३०२३३६१), पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे (मो.नं. ८७८८६४४९९४) यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद येथील पोलीस उपाधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे (मो.नं.९५९४६५८६८६) यांनी सापळा रचून यशस्वी केली. या सापळा पथकामध्ये पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, इफ्तेकार शेख, सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर यांचा समावेश आहे. दरम्यान,
लोकसेवक अथवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तर ०२४७२-२२२८७९ व टोल फ्री क्रमांक १०६४ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन म्हेत्रे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !