कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बाळासाहेबांची शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी लढविणार - साळुंके

कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बाळासाहेबांची शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी लढविणार - साळुंके

उस्मानाबाद दि.२६ (प्रतिनिधी) - कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली आहे. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्यावतीने संपूर्ण पॅनल उभा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे असे आवाहन जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनी केले.
कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात जिल्हाप्रमुख साळुंके यांनी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्षाचे विधानसभा संघटक तथा सरपंच अमोल पाटील, उपजिल्हाप्रमुख  आनंद वाघमारे, तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, सोनालीताई शिंदे, वर्षाताई परदेशी, शहरप्रमुख गजानन चोंदे, युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, युवासेना शहरप्रमुख कृष्णा हुर्गट, वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. मंदार मुळीक आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना साळुंके म्हणाले की, आगामी काळात नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. यासाठी पालकमंत्री प्रा सावंत यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळणार असले तरी शिवसैनिक म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे निवडणुकीत प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हासेगाव (सि.) गावच्या सरपंच प्रियाली रवींद्र गवळी, उपसरपंच अर्चना बालाजी मळगे, बालाजी मळगे, रविकिरण गिरी, किशोर लोहार, कुलदीप कानाडे, मारुती राऊत, सचिन गवळी, नितीन कांबळे, शेषनारायण कानाडे, आवाड शिरपुराचे सरपंच गोविंद आवाड, सुधाकर महाजन, सुहास बारकुल, पांडुरंग घोगरे, आडसूळवाडीचे सरपंच चंद्रसेन आडसूळ, दिलीप चौधरी, सचिन बारकुल, प्रमोद करवर, विशाल जाधव, आकाश काळे, श्रीमंत साळुंके यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !