पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते वालवड व आनाळा येथील विविध विकास कामांचे लोकार्पण

पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते वालवड व आनाळा येथील विविध विकास कामांचे लोकार्पण
उस्मानाबाद दि.२७ (प्रतिनिधी) - राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते भूम व परंडा तालुक्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.
 परंडा तालुक्यातील आनाळा येथील रस्ता, पशुवैद्यकीय दवाखाना आदी तर वालवड येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत मंजूर योजनेचा शुभारंभ  करण्यात आला.

माझ्या विधानसभा मतदारसंघाच्या नागरिकांनी मला मतदानरुपी आशीर्वाद देऊन मतदारसंघाचा विकास करण्यासाठी जो विश्वास माझ्यावर दाखवला होता त्या विश्वासाला साजेशे अनेक कामे आपण केली असल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले. तर 
मतदारसंघाचा शाश्वस्त विकास होण्यासाठी अनेक कामे करावी लागतात. त्यासाठी योग्य क्रमाने व योग्य दर्जाची कामे व्हावीत या भूमिकेतून भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा कामांचा आराखडा मी तयार केला आहे. तर या अनुषंगाने अनेक कामांना मंजुरी मिळाली असून त्याप्रमाणे अनेक विकास कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. तसेच 
यापुढे देखील या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन असे आश्वासन सावंत यांनी दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, गौतम लटके, धनंजय सावंत, दत्ता मोहिते, आण्णासाहेब जाधव, जयदेव गोफने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !