पालकमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत भूम येथे जनता दरबार


पालकमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत भूम येथे जनता दरबार 
उस्मानाबाद दि.२३ (प्रतिनिधी) - राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली दि.२७ मार्च रोजी भूम येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारामध्ये जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाच्या अध्यायावत माहितीसह स्वतः उपस्थित रहावे तसेच मंत्री सावंत यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही गैरहजर राहू नये. या दरबारामध्ये जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्ना संबंधी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करून तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या जनता दरबार मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !