मोदी सरकारच्या मुस्कदाबी विरोधात काँग्रेसची निदर्शनेतोंडाला काळीपट्टी बांधून मोदी केला जाहीर निषेध

मोदी सरकारच्या मुस्कदाबी विरोधात काँग्रेसची निदर्शने
तोंडाला काळीपट्टी बांधून मोदी केला जाहीर निषेध

उस्मानाबाद दि.२३ (प्रतिनिधी) - केंद्रामधील मोदी सरकारने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या घरी ४-४ दिवस पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. तसेच त्यांना संसदेत बोलू दिले जात नाही. त्यामुळे या सरकारने लोकशाहीची गळचेपी सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधली मोदी सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोदी सरकारचा निषेध करीत दि.२३ मार्च रोजी निदर्शने केली. दरम्यान, खा राहुल गांधी यांच्या विरोधात सुबुद्धीने करण्यात येत असलेली कारवाई तात्काळ न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी दिला.
केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात सूडबुद्धीने मोहीम उघडली असून त्यांच्या घरी उत्तर प्रदेश व दिल्लीचे पोलीस पाठविले जातात. या पोलिसांच्या माध्यमातून सलग ४-४ दिवस चौकशीच्या नावाखाली दहशत निर्माण केली जात आहे. तसेच खा गांधी यांना संसदेमध्ये बोलू दिले जात नाही. देशात विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम मोदी सरकार ईडी, सीबीआय व इतर संस्थांच्या माध्यमातून करीत आहे. हा अन्याय असून लोकशाहीचा आवाज दाबला जात असून लोकशाहीची गळचेपी सुरु आहे. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास तोंडाला काळी पट्टी बांधून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निदर्शने करून निषेध नोंदविला. यावेळी पूर्वी लढलो गोऱ्यांशी....आता लढतो चोरांशी, स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या, गौतम आदणीला साथ देणाऱ्या मोदींचा व संसदेमध्ये खा राहुल गांधी यांना बोलू न देणाऱ्या व महागाई वरील लक्ष विचलित करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, काँग्रेस मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, ओबीसी विभागाचे धनंजय राऊत, सेवा दलाचे अध्यक्ष विलास साळू, शीला उंबरे, मेहबूब पटेल, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सिद्धार्थ बनसोडे, संजय गजधने, अशोक बनसोडे, अहमद चाऊस,
तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, सलमान शेख, बालाजी माने आदींसह कार्यकर्ते मोठ्या

संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !