दिव्यांगना विविध साहित्यांचे केले वितरण

दिव्यांगना विविध साहित्यांचे केले वितरण

परंडा दि.२४ (प्रतिनिधी) - सोजर मूकबधिर शाळा भूम येथे भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एल्मिको मुंबई जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन कंपनी ऑफ इंडिया समाज कल्याण विभाग व दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाचे साहित्य मोजमाप शिबिर राबवण्यात आले होते. त्याचे वितरण संस्थेने दि.२४ मार्च रोजी केले.
यावेळी ३ चाकी सायकल, ६० कुबड्या, १२० काटी, २५ श्रवण यंत्र, २६४ व्हीलचेअर, ६१ वॉकर, १५ बॅटरीवरील गाड्या आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अल्मिकोचे कमलेश यादव, सुरज पाल, विशाल मोरया, अभिषेक आनंद, निवासी अपंग सास्तुर मुख्याध्यापक बालाजी नादरगे, वैद्यकीय अधिकारी भारत कांबळे, सोजर मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक कानगुडे, ज्ञानेश्वर केदार, सचिन चव्हाण, डमरे, प्रशांत गवळी, उमाप, शेख, ताटे, दिव्यांग उद्योग समूह संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके, जिल्हाध्यक्ष तानाजी सांगडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर केदार यांनी केले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !