उद्या बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन

उद्या बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन
उस्मानाबाद दि.२७ (प्रतिनिधी) - नवतेजिस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उपक्रम विकास प्रकल्प अंतर्गत महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन दि.२७ मार्च रोजी करण्यात आले आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र ओ एसीस (ओस्ला) लेडीज व अक्षरवेल महिला साहित्य मंडळ, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत आठ मार्च महिला जागतिक दिन व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष २०२३ निमित्त महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन दि. २८ ते ३० मार्च या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक चैतन्य गोखले, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी. हणबर, आत्माचे प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुनील अंकुश, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सचिन ससाणे, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड, महिला आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी सिद्धाराम माशाळे, अक्षरवेलच्या अध्यक्षा रेखाताई ढगे व ओएसीस (ओस्ला) लेडीज किरण देशमाने आधी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यासमोरील दि उस्मानाबाद क्लब येथे सकाळी १०ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे कार्यक्रमास जिल्हाभरातील बचत गटाच्या महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अधिकारी शोभा कुलकर्णी यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !