सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत डिजिटल बोर्डचे लोकार्पण
सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत डिजिटल बोर्डचे लोकार्पण
उस्मानाबाद दि.२० (प्रतिनिधी) - राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत डिजिटलचे लोकार्पण तर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
मंत्री प्रा डॉ सावंत यांच्या स्थानिक विकास निधी व २५/ १५ योजने अंतर्गत काम पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण वाशी तालुक्यातील यशवंडी व भूम तालुक्यातील रामकुंड येथे करण्यात आले. तर वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तर सरस्वती विद्यालयात डिजिटल बोर्ड देण्यात आलेला असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भैरवनाथ शुगर वर्कचे कार्यकारी संचालक तथा डीसीसी बँक बँकेचे संचालक केशव सावंत, वाशीचे माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, शिवसेनेचे पारगाव सर्कल प्रमुख बंडू खोसे, विजोराचे तात्या खोसे, सरपंच चंदणशिवे, उपसरपंच आण्णा हाके, शिवसेना शाखाप्रमुख आप्पा हाके, युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण गायकवाड, पोपट वाघमोडे, हनुमंत हाके, राहूल आडमुठे, सुदर्शन पाटील, रणजीत भैरट यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.