पालकमंत्री सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त नितीन पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी दिला ५ लाख ५१ हजार रुपयांचा निधी

पालकमंत्री प्रा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त नितीन पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी दिला ५ लाख ५१ हजाराचा निधी

उस्मानाबाद दि.१९ (प्रतिनिधी) -
राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिरढोण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी शिरढोण येथील शिवसेनेचे कार्यकर्ते नितीन लक्ष्मण यादव पाटील यांनी स्व खर्चातून ५ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री सावंत  यांच्या हस्ते ॲड. धनंजय धाबेकर (उस्मानाबाद), ऍड सत्यवान गपाट (वाशी), सुमंत नाईकवाडे, धम्मपाल गोरे, राम पवार (शिरढोण), श्रीमंत शिंदे (पुणे) यांच्या उपस्थितीत शिल्पकार उमेश व्हरकट (पुणे) यांना देण्यात आला. हा पूर्णकृती पुतळा १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त शिराढोणरकर यांना देण्यात येणार आहे.
      छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ही घरावर बसवणारे पाटील कोण आहे.
      वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी इच्छाशक्तीच्या बळावर केंद्रीय राखीव दलात नोकरीस लागलेल्या नितिन पाटील यांचे सरकारी नोकरीत मन रमेना. जेमतेम २-३ वर्षाची सेवा बजावल्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन गाव गाठले. त्यानंतर त्यांनी गावात सुरवातीस हाॕटेल व्यवसाय सुरू केला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही नितिनने घेतलेला निर्णय हा कमालीची जोखीम स्विकारणाराच होता. परंतू प्रचंड इच्छाशक्ति व अंगी असलेल्या प्रामाणिकपणाच्या जोरावर हळूहळू व्यवसायात जम बसवण्यास सुरुवात केली.
जिद्द, चिकाटी व काटेकोरपणा या गुणाचा अंगीकार करून स्वतःच्या व्यवसायिक कक्षा व सिमा रूंदावून नितिनने आपला चांगलाच जम बसवला. जम बसल्यानंतर स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत जागा खरेदी करून घराचे बांधकाम सुरू केले. तीन मजली घराचे बांधकाम पूर्ण करून याच घराच्या पक्क्या छतावर दीडशे चौरस फूट जागेत चबुतरा तयार करून सहा महिन्यापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळ्या दिवशी म्हणजे ६ जून रोजी नितिन यांनी छ. शिवाजी महाराजांचा आश्वरूढ पुतळा उभारला आहे. नितिन यांच्या या निर्णयाचे गाव परिसरातील शिवप्रेमी जनतेस प्रचंड कुतूहल आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमींच्या माना अभिभानाने नितिन पाटील यांच्या घराच्या दिशेने वळतात यात शंका नाही.  गावातील भगवंत नगर परिसरात असणाऱ्या देवगिरी या वास्तुवर उभारलेला हा आश्वरूढ पुतळा उभारून जोपासलेली शिनिष्ठा हि येणाऱ्या पिढीस छ. महाराजांचे कार्य व त्यांचा जाज्वल्य इतिहास वारंवार आठवण्यास भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. तसेच त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शिराढोण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण (लोकार्पण ) करण्यात येणार आहे. समाजा-समाजात वातावरण दूषित करण्याचे काम काही मंडळी करीत असतात. परंतू सर्व समाज एकत्र रहावा यासाठी नितीन पाटील हे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल शिराढोणसह सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !