नैतिक जबाबदारी स्विकारीत आरोग्यमंत्री प्रा डॉ सावंत यांनी केली ३ लाखांची मदत

नैतिक जबाबदारी स्विकारीत आरोग्यमंत्री प्रा डॉ सावंत यांनी केली ३ लाखांची मदत

उस्मानाबाद दि.६ (प्रतिनिधी) - सामाजिक क्षेत्रातील सर्वांगीण प्रश्न जवळून पाहणारे व आलेल्या अडचणीला तात्काळ धावून जाणारे व्यक्ती म्हणून ज्यांनी राज्यात लवकिक मिळविला आहे. ते राज्याचे आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी नुकतेच निधन झालेल्या शिव क्रांती सेनेचे संस्थापक संजय सावंत यांच्या कुटुंबीयांना नैतिक जबाबदारी स्विकारीत तात्काळ ३ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
मराठा समाजासाठी तळमळीने अहोरात्र लढणारे शिवक्रांती सेनेचे संस्थापक संजय सावंत यांचे नुकतेच  दुःखद निधन झाले. त्यांच्या आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे कुटुंबाची परवड होऊ नये यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदतीसाठी आवाहन केले होते.

संजय सावंत यांचे मराठा समाजाच्या चळवळीत मोठे योगदान असून समाजातील उपेक्षित घटकांसाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकर घेऊन मदत केलेली होती. मात्र त्यांच्या पश्चात कुटुंबाची परवड होऊ नये राज्याचे आरोग्यमंत्री, मराठा भूषण प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी ३ लाख रुपये रोख त्यांच्या पत्नी अर्चना संजय सावंत यांच्याकडे दि.६ मार्च रोजी सुपूर्द केले. विशेष म्हणजे सावंत यांच्या मुलाचे व मुलीचे पालकत्व मंत्री सावंत यांनी स्विकारले आहे. 

................................................................

आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका - मंत्री सावंत

चळवळीत काम करणाऱ्या माझ्या प्रत्येक बांधवास माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या सर्वांवर आपापल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. चळवळीत काम करताना आपल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या कुटुंबाप्रती ही माझी नैतिक जबाबदारी असल्याची  भावना त्यांनी व्यक्त केली.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !