भाजप जिल्हाध्यक्षांनी आम्हाला रोखून दाखवावे - काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांचे खुले आव्हान

भाजप जिल्हाध्यक्षांनी आम्हाला रोखून दाखवावे  काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांचे खुले आव्हान

उस्मानाबाद दि.२६ (प्रतिनिधी) - काल दि.२५ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात आंदोलन करतेवेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी व सहकाऱ्यांनी देशाचे नेते राहुल गांधी यांच्या बद्दल असभ्य भाषेत घोषणाबाजी केली. तसेच भाजप जिल्हाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अपशब्द वापरून रस्त्यावर फिरू न देण्याची वल्गना केली आहे. याचा जाहीर निषेध करून मी भाजप जिल्हाध्यक्षांना सांगू इच्छितो की, काँग्रेसचा विचार हा देशाचा विचार आहे. आम्ही लोकशाही बळकट करण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी व संविधानाच्या रक्षणासाठी दररोज रस्त्यावर आहोत. आपल्यात हिम्मत असेल तर तुम्ही दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आम्हाला रोखून दाखवावे असा थेट इशारा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिला आहे.
राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याची अत्यंत खोटी अफवा पसरवून हेतूतः समाजात तेढ निर्माण करीत आहेत. असे चुकीचे वर्तन करू नका व भाषेच्या मर्यादा पाळाव्यात असा मार्मिक सल्ला देखील दिला आहे. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष विरुद्ध काँग्रेस पदाधिकारी असा नव्याने वाद सुरु झाला आहे. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !