शिवसेना नेते प्रशांत चेडे यांच्या हस्ते सारोळा मांडवा पाईपलाईनचे उद्घाटन
शिवसेना नेते प्रशांत चेडे यांच्या हस्ते सारोळा मांडवा पाईपलाईनचे उद्घाटन
वाशी दि.२७ (प्रतिनिधी) - राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाईपलाईनचे उद्घाटन शिवसेना नेते प्रशांत चेडे यांच्या हस्ते दि.२७ मार्च रोजी करण्यात आले. यावेळी वाशी नगर पंचायतचे नगराध्यक्ष नितीन चेडे, नगरसेवक प्रसाद जोशी, उत्तम कवडे, मंत्रालयातील कक्ष अधिकारी विकास मोरे, सारोळा मांडवाचे उपसरपंच सुनिल मोरे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी शिंदे, रामदास डोईफोडे, राजेश मोरे, सतिश सुकाळे, अभिमान मोरे, भागवत मोरे, मुन्ना मोरे, जयराम मोरे, सुजय मोरे, ऋषिकेश मोरे, अजय मोरे, पवन मोरे, अक्षय मोरे, पृथ्वीराज मोरे, बाजीराव मोरे, शिवाजी मोरे, हरिभाऊ मुळे, वैजिनाथ मोरे, काका मोरे, सिद्धेश्वर मुळे, आण्णा मोरे आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.