मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिलेल्या शेतकऱ्यांना मंत्री सावंत यांनी दिली १२ लाखांची मदत ! आश्वासनांची तात्काळ पूर्ती करणारे राज्यातील एकमेव मंत्री संकटग्रस्तांच्या मदतीला मंत्री सावंत आले धावून
मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिलेल्या शेतकऱ्यांना मंत्री सावंत यांनी दिली १२ लाखांची मदत !
आश्वासनांची तात्काळ पूर्ती करणारे राज्यातील एकमेव मंत्री
संकटग्रस्तांच्या मदतीला मंत्री सावंत आले धावून
धाराशिव (दि.१४) - अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आल्यानंतर शेतकऱ्यांना वैयक्तिक रित्या मदत करणार असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी दिले होते. ती मदत द्राक्ष बागायतदार सिताबाई सुरवसे यांना १० लाख तर टरबूज उत्पादक बाबासाहेब उंबरदंड शेतकऱ्यास २ लाख अशी एकूण १२ लाखांचे धनादेश जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी दि.११ एप्रिल रोजी केली होती. या पाहणी दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर सावंत यांनी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी तुळजापूर तालुक्यातील मोरडा भेट दिलेल्या शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रा डॉ सावंत यांच्याकडून १२ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांनी तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील द्राक्ष बागायतदार सिताबाई सुरवसे यांच्या द्राक्ष बागेला भेट दिली होती सीताबाई यांची पूर्ण द्राक्ष बाग गारपीट ने उद्ध्वस्त झाली होती. मुख्यमंत्री शिंदे व मंत्री सावंत पाहणी करण्यासाठी आले असता या महिलेने त्यांच्या समोरच हंबरडा फोडत आता आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही, मदत करा अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. क्षणाचाही विलंब न लावता सावंत यांनी माझ्याकडून वैयक्तिक १० लाख मदत करणार असल्याचे आश्वासन सावंत यांनी दिले होते. त्यावर सावंत यांनी सीताबाई सुरवसे यांना १० लाख रुपये तर टरबूज उत्पादक शेतकरी बाबासाहेब उबरदंड यांना २ लाख रुपयांची मदत दिली असून मुख्यमंत्री बांधावरून परतून दोनच दिवसात मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी अनिल खोचरे, दत्ता मोहिते, गौतम लटके, धनंजय पाटील आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सावंत हे पालकमंत्री नव्हे तर तारणहार, तारकमंत्री
पालकमंत्री सावंत हे आडल्या, नडल्या व गरजवंत व्यक्तींना मदत करण्यासाठी सतत धडपड करीत असतात. परंडा, भूम, वाशी या मतदारसंघात सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी पडलेले पावसाचे पाणी जमिनीत अडवून ते शिवारात मुरवावे यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांतीच्या माध्यमातून ओढा, नाला व नंदी रुंदीकरण व खोलीकरण आदी कामे स्वखर्चातून केली व सुरु आहेत. तर आजारी व्यक्तींना दवाखान्यात आवश्यक सुविधा तसेच आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गाव विकासासाठी मंत्री सावंत हे विशेष प्रयत्न करीत आहेत. तर दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे दिलेले आश्वासन तिसऱ्या दिवशी बांधावर जाऊन पूर्ण करणारे एकमेव मंत्री असल्यामुळे ते जिल्ह्याचे पालक नव्हे तर तारणहार व तारकमंत्री असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून सुरू झाली आहे.