अपघातग्रस्त वराळे यांच्यावर शासकीय योजनेद्वारे मोफत उपचारपालकमंत्री सावंत यांचे मानले आभार

अपघातग्रस्त वराळे यांच्यावर शासकीय योजनेद्वारे मोफत उपचार
पालकमंत्री सावंत यांचे मानले आभार

धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - भूम तालुक्यातील चिंचपूर येथील गोकुळ वराळे यांचा मुलगा महेश याचा बसला धडकून अपघात झाला होता. वैद्यकीय उपचार करण्यासारखी वराळे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी शासकीय योजनेमधून उपचार करून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
भूम तालुक्यातील चिंचपूर येथील महेश गोकुळ वराळे या युवकाचा दि.२ एप्रिल रोजी बसला धडकून अपघात झालेला होता.  त्याला वैद्यकीय उपचार करण्यासाठी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र वराळे यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे वराळे यांनी चिंचपूर (ढगे) चे सरपंच विशाल ढगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पांडुरंग धस यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. तर धस यांनी हॉस्पिटलशी संपर्क साधून महेश याची शासकीय योजनेमधून मोफत शस्त्रक्रिया करण्यात यावी असे हॉस्पिटल व्यवस्थापनास सांगितले. त्यामुळे हॉस्पिटल व्यवस्थापनने सर्व वैद्यकीय उपचार शासकीय योजनेतून मोफत केले. यासाठी वैद्यकीय मदत अधिकारी डॉ. रवींद्र अनभुले, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत, वैद्यकीय मदत कक्षाचे पांडुरंग धस, विशाल ढगे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख युवराज हुंबे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यामुळे गोकुळ वराळे यांनी पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचे आभार मानले आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !