अखेर भाजप शिवसेना शेतकरी विकास पॅनल निवडणुकीसाठी एकत्र पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत व आ राणाजगजितसिंह पाटील यांच्यात समन्वय




अखेर भाजप शिवसेना शेतकरी विकास पॅनल निवडणुकीसाठी एकत्र

पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत व आ राणाजगजितसिंह पाटील यांच्यात समन्वय

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीच्या शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांची घोषणा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी नाईकवाडी यांनी भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून जिपचे माजी उपाध्यक्ष शिवाजी नाईकवाडी यांनी प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालयात आयोजित संयुक्त बैठकीत दि.२० एप्रिल रोजी केली.

सोसायटी सर्वसाधारण मतदार संघाचे उमेदवार राजेंद्र बाळासाहेब पाटील, संजय परसराम वाघ, निहाल कलिमोद्दीन काझी, प्रदिप नेताजीराव वीर, दत्तात्रय विनायक देशमुख, अमरसिंह रामराजे पडवळ, संतोष शहाजी पवार तर सेवा सहकारी संस्था महिला गटातून मनिषा अरविंद पाटी, स्वाती अरुण कोळगे तसेच सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्ग (ओबीसी) गटातून गोविंद ज्ञानोबा लगडे तर
सेवा सहकारी संस्था भ.वि.जा. (व्हीजेएनटी) गटातून शेषेराव हिरामण चव्हाण यांना तसेच
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून अनिल शहाजी भूतेक, सुधीर बलभीम भोसले व ग्रामपंचायत अनुसुचित जाती, जमाती गटातून सुभाष महादेव पाटोळे तर ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून मूराद नन्नू पठाण यांची तसेच
व्यापारी मतदार संघातून विपीन त्रिंबक काकडे,  बाळकृष्ण दत्तात्रय झाडे यांना तर
हमाल मापाडी गटातून सौदागर अर्जुन चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वागीण विकासासाठी तालुक्यातील शेतकरी, व्यापारी व सर्व घटकांचा विचार करुन पॅनल उभा केले आहे. येणाऱ्या काळात एक चांगली बाजार पेठेचे नाव लौकीक करण्यासाठी ही निवडणूक भाजप- शिवसेना युतीच्यावतीने लढवली जाणार आहे. राज्यात असलेल्या भाजपा- शिवसेना युतीचे सरकार आणि त्यांच्या पाठीशी असलेले मतदार यामुळे भाजपा-शिवसेना युतीचे शेतकरी विकास पॅनल विजयी होईल असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी व्यक्त केला. तसेच एक दिलाने पालकमंत्री तानाजी सावंत व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक लढवली जाणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बहुमताने जिंकणार असल्याचे विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी‌ व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड, ऍड. नितीन भोसले, सतिष देशमुख, बालाजी गावडे यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !