पैलवान विजय मांडवे याने पालवे अस्मान दाखवीत १ लाख रुपयांचे बक्षिस पटकावले

पैलवान विजय मांडवे याने पालवे अस्मान दाखवीत १ लाख रुपयांचे  बक्षिस पटकावले
परंडा दि.२०(प्रतिनिधी ) - तालुक्यातील श्री क्षेत्र सोनारी येथील श्री काळभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती आखाड्यात दि.१९ एप्रिल रोजी अंतीम १ लाख  रुपये  इनामाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पीयन विजय मांडवे (सोनारी) याने नाथा पालवे (सांगली) यास घुटना डावावर चितपट करीत रोख बक्षिस पटकाविले. कुस्ती आखाडा मैदानातील अंतीम १ लाख इनाम कुस्ती विजय धुमाळ (करमाळा) व राजेंद्र सुळ (सातारा)  यांच्यात होवून अटीतटीच्या, तुल्यबळ लढतीनंतर  बरोबरीत सोडविण्यात आली. या कुस्ती मैदानात रोख इनामाच्या लहान मोठ्या २०० कुस्त्या घेण्यात आल्या.
या कुस्ती आखाड्यासाठी राज्यातील नामांकीत मल्लांनी हजेरी लावली होती.
  सोनारी येथील श्री काळभैरवनाथांचा यात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.लाल मातीवरच्या कुस्तीत आहे खरी मस्ती याचा प्रत्यय आखाड्यात आला. दि.१९ एप्रिल रोजी दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत कुस्त्यांचा आखाडा घेण्यात आला. नवीन बांधलेल्या भक्तनिवासासमोर भव्य  कुस्ती आखाड्याचे पूजन जिपचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यासह पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.  दुपारी ४ वाजता कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी  धनंजय सावंत, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बाळासाहेब आवारे, उपमहाराष्ट्र केसरी आबा सुळ (सातारा), भैरवनाथ तालमीचे संस्थापक नवनाथ जगताप, जेष्ठ वस्ताद विश्वनाथ काशीद, जेष्ठ निवृत्त क्रिडा शिक्षक शिवाजी कदम, महाराष्ट्र चॅम्पीयन आप्पा काशीद, बापु मांडवे, आण्णा महाराज (नगर), महाराष्ट्र चॅम्पीयन राम काशीद, भैरवनाथ मंदीराचे मुख्य समीर पुजारी, अंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विक्रांत हिंगे, विक्रांत वाघमारे  आदी उपस्थित होते. सोनारी हे गाव कुस्ती खेळासाठी राज्यात सर्वपरिचित आहे. या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक नामांकित मल्ल हजेरी लावतात.  राज्यातील विविध भागामधुन नामांकित मल्ल, आजी-माजी वस्ताद मंडळी आवर्जुन कुस्ती आखाड्यासाठी हजेरी लावतात.स्पर्धेसाठी सुसज्ज लाल मातीचा आखाडा तयार केला होता.या कुस्ती मैदानात २०० रुपयापासुन एक लाख रुपयांपर्यंत इनाम बक्षिसे देण्यात आली.२०० लहान-मोठ्या कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.दुरगावाहुन आलेल्या मल्लांनी कुस्ती खेळातील डाव-प्रतिडावांचे मल्लयुध्द खेळुन मैदानात मोठी रंगत आणली. हलगीच्या कडकडाटात मल्लांनी चटकदार व चितपटीने केलेल्या कुस्त्यांमुळे आखाड्यात पैलवानांच्या खडाखडीने स्पर्धा रंगतदार झाल्या. या मैदानात कुस्तीचे डावपेच ढाक मारणे, एकेरी पट काढणे,क्षसाल्तु (बॕक थ्रो) झोळी बांधणे, भारंदाज, कलाजांग, एकलांगी, घुटना, घिस्सा, छडी टांग, दसरंग फिरणे, कुंदा करणे, मोळी बांधणे आदी डावांनी मैदानात मोठी रंगत निर्माण झाली होती. विजयी मल्लांना प्रेक्षकांनी रोख बक्षिसे दिली. मैदानात मल्ल हणमंत पुरी, दिपक पाटील,विरेंद्र काशीद, विकास गटकळ, सागर मोरे, मेघराज जगताप, धीरज बारसकर, सुमीत काळे,बबलु मदने, कृष्णा पवार, केतन साळुंखे, सागर ठवरे, तुकाराम मांडवे,शहाजी फले, विजय चोरगे,दगडु फरतडे, शिवयोग पडघण, किरण पाडुळे, सुनिल नवले, सतपाल सोनटक्के, किशोर घोगरे, करण फले  यांनी प्रतिस्पर्ध्यास चितपट करुन प्रेक्षणीय विजय मिळविले ,या आखाड्यात महिला कुस्तीगीर अहिल्या लवटे, सोनाली हाडसे, प्रतिक्षा कोळी, तेजस्वीनी शिंदे आदिंनी प्रेक्षणीय विजय मिळविले. जेष्ठ वस्तादमंडळीचा गौरव सत्कार करण्यात आला.पंच म्हणुन धनंजय सावंत,  आप्पा काशीद, जयराम नलवडे, शिवाजी घाडगे,राम पाटील संजय साळुंखे, बालाजी मिस्कीन, दिलीप मोरजकर, राहुल भांडवलकर, यांनी काम पाहिले.प्रसिद्ध कुस्ती निवेदक राजाभाऊ देवकते (वाकडी) दिनेश गवळी (बार्शी) यांनी उत्कृष्ट खुमासदार समालोचन केले. कुस्ती आखाड्यासाठी, यात्रा कमिटीचे संभाजी सुरवसे, नवनाथ जगताप, शांतीलींग गाढवे, भाऊसाहेब मांडवे, राम पाटील, आगंद फरताडे,
सरपंच दिपक दुबळे, रवी मांडवे आदींसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता. या कुस्ती आखाड्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर, बीड, धाराशिव आदी भागातून मल्ल मोठ्या संख्येने आले होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !