पालकमंत्री सावंत यांच्यावतीने येडेश्वरी यात्रेत महाप्रसादाचे वाटपहजारो भक्तांनी घेतला लाभ

पालकमंत्री सावंत यांच्यावतीने येडेश्वरी यात्रेत महाप्रसादाचे वाटप
हजारो भक्तांनी घेतला लाभ

उस्मानाबाद दि.७ (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेमध्ये राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, दत्ता साळुंके यांच्या हस्ते दि.७ एप्रिल रोजी महाप्रसाद वाटप करण्यात आला. यांचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

येरमाळा येथे चैत्र पौर्णिमा यात्रेला प्रारंभ झाला असून दि.७ एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. देवीच्या पालखी मिरवणुकीनंतर पालकमंत्री सावंत यांच्यावतीने भाविकांना महाप्रसाद वाटप करुन देवीचरणी सेवा अर्पण करण्यात आली. तसेच उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन भाविकांना थंड मठ्ठा वाटप करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !