उस्मानाबाद, कळंब बाजार समिती बाळासाहेबांची शिवसेना स्वबळावर लढणार - जिल्हाप्रमुख सुरज साळुंके



उस्मानाबाद, कळंब बाजार समितीच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना स्वबळावर मैदानात

उस्मानाबाद दि.३ (प्रतिनिधी) - उस्मानाबाद व कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना स्वबळावर मैदानात उतरली आहे. या दोन्ही निवडणुकीसाठी आमचे
स्वतंत्र पॅनल उभारून लढणार असल्याचे
जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
व सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत बाजार समितीची सत्ता खेचून आणणार असल्याचेही साळुंके यांनी सांगितले. त्यासाठी दोन्ही बाजार समिती निवडणुकीच्या सर्व १७ जागांसाठी उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दि.३ एप्रिल रोजी दाखल करण्यात आली आहेत.  उस्मानाबाद येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्हाप्रमुख साळुंके यांच्यासह उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे आगामी काळात प्रचाराची रणधुमाळी पालकमंत्री प्रा डॉ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !