भाजपच्या मी स्वा. सावरकर यात्रेस प्रतिसाद
भाजपच्या मी स्वा. सावरकर यात्रेस प्रतिसाद
उस्मानाबाद दि.७ (प्रतिनिधी) - मी सावरकर वीर सावरकर, स्वातंत्र्य वीर सावरकरांचा विजय असो, वंदे मातरम, भारत माता की जय अशा जयघोषात शहरातील सावरकर समर्थक भाजपा व शिवसेना कार्यकर्त्यानी दि.७ एप्रिल रोजी फेरी काढली.
यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके आदी उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांचा अपमानजनक उल्लेख केल्या नंतर भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीने सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले होते. याचे सूत्रसंचालन भाजपाचे उपाध्यक्ष व गौरव यात्रेचे संयोजक युवराज नळे यांनी केले. यावेळी आ. पाटिल यांनी महापुरुषांच्या बाबतीत कोणीही बोलताना मर्यादा संभाळावी असे आवाहन केले. तसेच राहुल गांधी यांना न्यायालयाने मोदी आडनावाचा अपमानजनक उल्लेख केल्याबद्दल शिक्षा सुनावली आहे. तिथे त्यांनी सावरकरांचा उल्लेख करण्याचा संबंध येतो कुठ ? असा प्रश्न उपस्थित केला. तर नितीन काळे यांनी सावराकरांच्या कामाचे मूल्यमापन कारण्या इतपत गांधी यांची लायकी नसून सावरकरांच्या अपमानाची परतफेड जनता करेल असे नमूद केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या गौरव यात्रेत माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, सुनील काकडे, ऍड. नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, सतीश दांडनाईक, पांडुरंग लाटे, राहुल पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, अभय इंगळे, प्रविण पाठक, महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पनगुडे, अस्मिताताई कांबळे, उषा सर्जे, मनिषा केंद्रे, पांडूरंग पवार, इंद्रजित देवकते, राजाभाऊ कारंडे, मोहन मुंडे, संग्राम बनसोडे, सुजित साळुंके, प्रविण सिरसाठे, समाधान मते, संदिप इंगळे, विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर, रोहीत देशमुख, प्रीतम मुंडे, वैभव हंचाटे, ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, गिरीश पानसरे, बालाजी कोरे, विद्या माने, देवकन्या गाडे, श्रीराम मुंबरे, अतुल चव्हाण, मेसा जानराव, सागर दंडनाईक आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.